पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून जवळ असलेल्या मरगल्ला हिल्स भागात एका खाजगी कंपनीच्या विमानाला अपघात झाला. ज्या भागात विमानाला अपघात झाला त्या भागात पाकिस्तान सैन्याचा तळ आहे. या भागात पाक सैन्याने विमानभेदी तोफा तैनात केल्या आहेत. हा भाग साधारण 12 हजार 605 हेक्टर परिसरात व्यापलेला आहे.
मरगल्ला हिल्स हा भाग अत्यंत निसर्गरम्य भाग मानला जातो. या भागातील दामनकोह रिसोर्ट अत्यंत प्रसिद्ध आहे. या भागात उंच टेकड्या असून, ट्रेकिंग, पॅराग्लायडींग करण्यासाठी अनेक पर्यटक या भागात येत असतात.
या भागातून एअरब्ल्यू कंपनीचे विमान उडत असताना, काही काळापूर्वी त्याचा संपर्क तुटतो, आणि कालांतराने विमानाला भीषण अपघात झाल्याची बातमी येऊन धडकते. यात काही तरी गोम आहे.
या भागात सातत्याने पाक सैन्याचे प्रशिक्षण सुरु असते. विमानांना या भागावरुन जाण्याची परवानगी असली तरी त्यांच्यासाठी निश्चित नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. असे असतानाही विमान कमी उचंवरुन का उडत होते, हे मोठा प्रश्नचिन्ह आहे.
ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या भागात पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, परंतु स्थानिक रहिवाश्यांनी मात्र दुसराच दावा केला आहे.
विमानाचे आकाशातच दोन तुकडे झाल्यानंतर विमान कोसळल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकमध्ये सध्या तालिबानचे प्रस्थ वाढत आहे. लखनो, इस्लामाबाद, कराची या सारख्या शहरात राजरोसपणे दहशतवादी हल्ले होत असताना, अत्यंत सुरक्षित मानल्या जाणार्या भागात अशा प्रकारे विमान कोसळणे हा घातपातच असल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment