पाकिस्तानच्या राजधानीपासून जवळच असलेल्या मरगल्ला हिल्स भागात आज विमानाला झालेल्या अपघातात 150 जण ठार झाल्याची भीती वर्तवली जात आहे. विमानात 159 प्रवासी व चालकदलाचे सदस्य होते. विमान तुर्कस्तानातून कराची मार्गे इस्लामाबादकडे जात असताना हा अपघात झाला.
अपघातानंतर या भागात बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली असून, पाच जणांना वाचवण्यात यश आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. खराब हवामानामुळे विमान या भागातील प्रसिद्ध दामनकोह रिसोर्टजवळ कोसळले.
मरगल्ला हिल्स भागात विमानभेदी तोफा तैनात आहेत. या भागात पाक सैन्याचे तळ असल्याने या अपघाताविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment