थाेर महात्मे हाेऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा....
अापण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बाेध खरा....
लाेकमान्य टिकळ म्हणतात, स्वराज्य माझा, जन्म सिद्ध हक्क अाहे अाणि ताे मी मिळवणारच.
माझ्या मुलाच्या शाळेमध्ये एक स्लाेगन स्पर्धा हाेती. त्याला त्याच्या अाईने अर्थात माझ्या पत्नीने या अाेळी सांगीतल्या अाणि त्याचे पाठांतर करवून घेतले. त्याने तितक्याच सुरेख पद्धतीने या अाेळी पाठ केल्या अाणि शाळेत धडाधडा एकदाच्या म्हटल्याही... मुलगा अाताकुठे ज्युनीअर केजीमध्ये अाहे. पण त्याने पाठ केलेल्या अाेळी त्याच्या मानाने तशा अवघडच हाेत्या. पाठांतर झाले की अापण काहीही बेधडकपणे अाणि ठामपणे बाेलू शकताे हा मानवी गुण असल्याचे माझ्या मुलाने पुन्हा एकदा सिद्ध केले.
हिच सिद्धता मला काॅंग्रेसचे नेते अाणि गांधी कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय चालवणाऱ्या राहुल गांधी यांच्या भाषणातून काल जाणवली. मागील काही दिवसांपासून ललित माेदी प्रकरणात काॅंग्रेस अाणि विराेधकांनी ‘रान’ अाणि ‘रन’ दाेनीही माजवले अाहे. मंगळवारी राहुल गांधी यांनीही असेच काहीसे पाठांतर लाेकसभेत म्हणून दाखवले. ‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडून लाेकांना उत्तरे हवी अाहेत. त्यांनी लाेकसभेत माेदी (ललित) प्रकरणावर बाेलावे. लाेकांना माेदीजी एेवजी माैनीजी दिसत अाहेत. इतकेच काय तर माेदीजींना राहुल यांनी चक्क गांधीजींच्या तीन माकडांचेही उदाहरण दिले. तेच रटलेले बुरा मत देखाे, बुरा मत बाेलाे, बुरा मत सुनाे.
सुट्टांची तब्बल दाेन महिन्यांची मजा अाटाेपून अाल्यानंतर राहुल यांच्यातील प्रगल्भता काहीशी वाढली असेल असा अापल्याप्रमाणेच माझाही समज झाला हाेता. पण हा समज मंगळवारी राहुल यांनी केलेल्या पाठांतराच्या भाषणाने साफ खाेटा ठरवला अाहे. सुषमा स्वराज यांना विराेध का सरकारला विराेध या पेचात काॅंग्रेस पुन्हा एकदा अडकल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवत हाेते. अाता तर असाही अाराेप हाेत अाहे की, राहुल यांनी चक्क कागदावर हे स्लाेगन लिहून अाणले अाणि संसदेत ते बाेलले. अगदी माझ्या मुलाने त्याच्या शाळेतील स्लाेगन काॅम्पीटीशनमध्ये पाठांतर एेकवल्या प्रमाणे.
राहुल यांनी सुषमा स्वराज यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला खरा पण, त्यांच्या अावड्यात कार्टूनमध्ये ज्या प्रमाणे माेगलीने फेकलेला बुमरॅंग त्याच्या हातात परत येता. त्याच प्रमाणे सुषमा यांच्या भाषणाने राहुल गांधी यांचा बुमरॅंग काॅंग्रेसवर परत अाला अाहे. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्यासारखे दुसरे नेते काॅंग्रेसला मिळालेले नाहीत हे या भारतीय लाेकशाहीचे अाणि काॅंग्रेस पक्षाचे माेठे दुर्देव अाहे. देशाचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी येथे भाष्य करण्याचे मी मुद्दाम टाळताे अाहे. नेहरू यांच्यामागे अनेक वाद-प्रतिवाद अाहेत. इंदिराजी अाणि राजीवजी यांच्या मागेही हे वाद अाहेतच पण त्यांनी किमान पक्षाची व देशाची वाताहत हाेऊ दिली नव्हती. असाे. राहुल यांच्या कमबॅकचा पुन्हा एकदा केलेला प्रयाेग गांधी कुटुंबिय अाणि काॅंग्रेसला चांगलाच महाग पडण्याची चिन्हे दिसून येत अाहेत.
एक काळ हाेता संसदेत अटलजींसारखा खंबीर विराेधीपक्ष नेता अापण पाहिला अाहे. भारतीय संसदेची ही नेहमीचीच बाेंब अाहे की चांगला विराेधीपक्ष संसदेला कधीच मिळू शकला नाही. (एखाद दुसरा अपवाद वगळता.) अाता तर केवळ सरकारला विराेध करून अाक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न विराेधक करत अाहेत. असेच ललित माेदी नाट्यावरून सारे दिसत अाहे. हास्यास्पद बाब म्हणजे ललित माेदी प्रकरणावरून लाेकसभा मागील कैक दिवसांपासून ठप्प पडत असताना ताेच ललित माेदी म्हणताे, ‘मला कशाचेच टेन्शन नाही. ही तर मला सर्कस वाटतेय’ माेदी याचे हे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्यासारखे नसले तरी सामान्य भारतीयांच्या मनातील काॅंग्रेस अाणि विराेधी पक्षांबद्दलचा समज त्याने बाेलून दाखवला अाहे.
उधमपूरमध्ये पकडलेला पाकिस्तानी दहशतवादी नावेद, एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्याने भारतीय अाण्विक कार्यक्रमात निर्माण झालेली पाेकळी यासाऱ्यांना बगल देत मागील ६० ते ७० वर्ष राज्य केलेल्या काॅंग्रेस पक्षाला काेण कुठला ललित माेदी महत्त्वाचा वाटताेय. विराेध करणे हे विराेधी पक्षाचे काम अाहे. त्यांनी ते करावेच परंतु, अशा प्रकारचा वांझाेटा विराेध काय कामाचा.
स्व. पंतप्रधान राजीव गांधी, त्यांच्या पत्नी अाणि काॅंग्रेस अध्यक्षा साेनीया गांधी त्यानंतर त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यातील काॅमन गाेष्ट म्हणजे तिघांनाही राजकारणात रस नसताना केवळ कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय म्हणून त्यांना पक्षाने या जंजाळात अाेढले अाहे. राजीवजी यांनी इंदिराजींना राजकारणात येणार नाही असे ठामपणे सांगितले हाेते. त्यांनी इंदिराजी, तत्कालीन काॅंग्रेसचे नेते या साऱ्यांना विराेध केला हाेता. त्याहीवेळी राजीव काे लाअाेचे नारे पक्षांतर्गत लागलेले जुने जाणकार सांगतातच. साेनियांच्या बाबतीतही तेच झाले. राजीवजींच्या निधनानंतर कैकवर्ष साेनिया राजकारणापासून दूर हाेत्या. राहुल यांनाही त्यांनी दूर ठेवणेच पसंद केले हाेत.. इतकेच काय तर राहुल यांनीही अापली अाई काॅंग्रेसच्या मेन स्ट्रीममध्ये असेपर्यंत ‘नाे पाॅलिटिक्स’ हे स्लाेगन सतत वाचलेले अापल्याला अाठवत असेल. पण शेवटी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे दडपण, वंशपरंपरागत व्यवसायाच्या नावाखाली ज्यांना राजकारणाचा गंधही नाही अशा या माय-लेकराला राजकारणात अाेढले गेले.
अाज मागील कित्येक दिवसांपासून अापण पहाताेय सातत्याने राहुल गांधी यांना देशातील सर्वात माेठा नेता बनवण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जाताेय. पण त्याला काही केल्या यश येत नाही. याला कारणही तसेच अाहे. ‘जर अाडातच नाही तर पाेहऱ्यात कुठून येणार?.’ या खेळात काॅंग्रेसच्या प्रयाेगशाळेमुळे देशाचे माेठे नुकसान हाेतेय हे पक्षातील नेत्यांना का समजत नाही. का समजत असूनही डाेळे बंद करून ते दुध पिण्याचे काम करत अाहेत. काॅंग्रेसचे नेते अाणि अापले विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हेही काॅंग्रेसचे एकेकाळी पावरबाज नेते म्हटले जात. कदाचित तेही याला कंटाळले असतील व जेव्हा मनमाेहन सिंग यांना बदलण्याची मागणी केली जात हाेती तेव्हा त्यांनीही राष्ट्रपती बनण्याची इच्छा व्यक्त केली असेल. प्रणबजी हे अत्यंत खंबीर नेते मानले जातात. ते अत्यंत अभ्यासूही अाहेत. राजकारणातील त्यांचा गाढा अभ्यास अाहे. जेव्हा केव्हा देशावर व सरकारवर संकट अाले (काॅंग्रेसच्या काळात) तेव्हा प्रणबजींचा सल्ला घेतला जात. त्यांनी दिलेल्या निर्णयावरूनच पुढील अादेश दिले जात. अाता सारे काही ठप्प. कदाचित दूरदृष्टी असलेल्या प्रणबजींना हे तेव्हाच कळाले असेल अाणि म्हणूनच त्यांनी काॅंग्रेस अाणि राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असावा.
दरवेळेला पराभव झाल्यानंतर दाेन महिन्यांचे अात्मचिंतन देशाला परवडणारे नाही. याने देशाच्या नागरिकांवर तर अन्याय हाेताेचय परंतु, शत्रु राष्ट्रही याची मजा लुटत अाहेत. अाता परिस्थिती बदलली अाहे. माेदी सरकार सत्तेवर अापल्यापासून इतर राष्ट्रांमध्ये भारताचा दबदबा वाढताे अाहे. असे असताना देशांतर्गत सुरु असलेल्या ‘ललित’ नाट्यामुळे देशाचे काेट्यवधीचे नुकसान तर हाेतेच अाहे शिवाय देशाची पतही खराब हाेतेय. एक-दाेन नाही तर तब्बल दाेन महिन्यांपासून अापण संसदेतील हा खेळ पहाताेय. देशाच्या इतिहासात प्रथमच लाेकसभा अध्यक्षांना ‘ही लाेकशाहीची हत्या अाहे’ असे म्हणावे लागले अाणि संपूर्ण देशाने ते पाहिले.
राहिला प्रश्न राहुल बाबांचा तर काॅंग्रेसने त्यांना राजकीय नेता प्रेझेंट करण्यापेक्षा एखादी माेठी मल्टीनॅशनल कंपनी काढून द्यावी अाणि सीईअाे म्हणून तिथे त्यांची नियुक्ती करावी हेच अाता याेग्य ठरेल असे म्हणण्याची वेळ अाली अाहे. पंतप्रधान माेदी यांनी बांगलादेशसाेबत नुकताच केलेला सिमांबाबतचा करार हा अत्यंत दूरदृष्टीने घेतलेला निर्णय अाहे. या साऱ्या गाेंधळामुळे याकडे कुणाचेच लक्ष नाही. अशा निर्णयाने पाकिस्तान अाणि चीनही हादरलेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच एखाद्या राष्ट्राला अापण अापली गावे दिलीत अाणि त्याने त्यांची गावे अापल्यात विलीन केलीत. पण ज्याला देशाचा इतिहासच माहित नाही त्या राहुल गांधी यांना हा करार काय कळायचा?.
राहुल गांधी यांचा राजकारणाला विराेध अाहे पण राजकारणात येण्यासाठी नाही. हे त्यांनीच कबुल केले अाहे. दिल्लीतील काेलंबस स्कूल, प्रसिद्ध दून विद्यालयात प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर राहुल यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या फ्लाेरिडा येथील राेलिंस काॅलेजातून पदवी घेतली. यानंतर त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनीटी काॅलेजातून एम.फिलही पूर्ण केले.
खूप कमी जणांना माहिती असेल की राहुल यांनी व्यवस्थापन गुरू मानल्या जाणाऱ्या मायकल पाेर्टर यांच्या माॅनीटर ग्रुपमध्ये काहीकाळ कामही केले अाहे. यानंतर बॅकअप्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले अाहे. राहुल यांचा हा कार्यकाळ सांगण्याचे कारण म्हणजे २००४ मध्ये राहुल यांनी लाेकसभा निवडणूक लढवण्याची अधिकृत घाेषणा केली अाणि ते राजकारणात अाले. एक तपही राहुल यांनी अद्याप राजकारणात पूर्ण केलेले नाही. केवळ गरिबांच्या घरी जेवण केल्याने तसेच नुसते भारत भ्रमण केल्याने राजकारण समजत नाही. यासाठी राजकारणाचा पिंड लागताे. कुटुंबातील सर्वच जण एकच व्यवसाय असले तरी पुढच्या पिढ्यांना जर ताे व्यवसाय करावयाचा नसेल तर अनेकांनी अापले परंपरागत व्यवसाय साेडत अापल्याला ज्यात रस अाहे ते केल्याचे अापण पाहिले अाहे.
अशी अनेक उदाहरणे अाहेत. (त्यावर वेगळी चर्चा नकाे म्हणून त्यांचे उल्लेख इथे टाळत अाहे.) मध्यंतरी अमीर खानने एक चित्रपट काढला हाेता. ‘थ्री इडियट’ हा चित्रपट प्रचंड गाजला. अापल्या ज्यात रस नाही ताे व्यवसाय का करायचा हे त्याने यात मांडले हाेते. मुलांवर सक्ती करून डाॅक्टर, इंजिनिअर करण्याच्या नादात तुम्ही त्याचा अानंद हेरावून घेताय. यामुळे तुमचेच कुटूंब डिस्टर्ब हाेतेय हे त्याने यात मांडले हाेते. हा चित्रपट राहुल यांनीही पाहिल्याचे मी एेकले हाेते. यातील बाेध जर त्यांनी घेतला असता तर कदाचित अाज देशावर ही वेळ अाली नसती. राहुल यांना जर राजकारणात रसच नाही तर का अाणि काेण त्यांचे अाणि देशाचे करिअर खराब करण्याचा प्रयत्न करताेय? अाणि जर राहुल यांना राजकारणात रस निर्माण झाला असेल तर राहुल यांनी अाधी देशाचे संपूर्ण राजकारण, इतिहास पाहिला पाहिजे. देशाचा पंतप्रधान पत्रकं, नाेट घेऊन जर भाषणं करायला लागला तर मला माझाच मुलगा बरा वाटेल जाे निदान काेणतीही काॅपी हातात न घेता त्याच्या शाळेमध्ये शंभर एक मुलांसमाेर लाेकमान्य टिळकांचे प्रसिद्ध वाक्य बाेलून दाखवत असेल. निदान घाेकंपट्टी का असेना पण त्याने काॅपी हातात न घेता अाणि नाेटबुक हातात न ठेवता छाती ठाेकून दिलेले पाठांतर जसेच्या तसे म्हटल्याने मी मात्र सुखावलाेय.... प्रश्न अजुनही अनुत्तरीयच अाहे ४५ वर्षांचे राहुल माेठे कधी हाेणार?