Monday, June 13, 2016

साधू, सेना अन‌् मुख्यमंत्री




कधी तरी एक कथा एेकली हाेती. एक साधू नदीत शिष्यांसाेबत अांघाेळ करत असताे. त्याच्या पायाखाली नेमका एक खेकडा येताे. ताे साधू नम्रपणे त्या खेकड्याला उचलून पाण्याच्या बाहेर दूर साेडून येताे.  अापल्या शिष्यांच्या पायाखाली पुन्हा ताे खेकडा येऊ नये व त्याचे प्राण जाऊ नयेत एवढाच त्याचा ताे चांगला विचार. परंतु, बाहेर त्याला साेडताना नेमका ताे खेकडा त्या साधूच्या हातांना चावा घेताे. साधूंचे शिष्य हे सारं पहात असतात. परंतु, ताे साधू त्या खेकड्याला काेणतीही इजा न हाेऊ देता त्याला साेडून पुन्हा नदीत उतरताे. न राहून एक शिष्य शेवटी त्या साधूला विचारताेही ‘महाराज, त्या खेकड्याने अापल्या हाताचा चावा घेतला, अापण त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत हाेतात तरी ताे चावला, अापण तरी त्याचे प्राण वाचवलेत. त्यावर साधू महाराज उत्तरले, चावणे हा खेकड्याचा गुणधर्म अाहे. मनुष्याचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य.. त्याने त्याचे काम केले मी माझे काम केले. 
 
ही कथा अात्ता अाठवण्याचे कारण म्हणजे सध्या सेना-भाजपमध्ये सुरु असलेले वाक‌्युद्ध. सेना- भाजप युती ही काही अाजची नाही. मात्र, सध्या दाेनही पक्षांमध्ये सुखाचा संसार साेडून एकमेकांवर मिळेल तिथे चिमटे काढण्याचे प्रकार सुरु अाहेत. तर वरील गाेष्टीत जसे खेकडा गुणधर्म साेडत नाही तसे राजकारणीही अापला गुणधर्म साेडत नसल्याने ही कथा इथे नमूद करावी वाटली. 

माेदींवरून सुरू झालेले सेना-भाजपचे व्टिट‌् युद्ध संपत नाही ताेच अाता मान्सून पूर्व पडलेल्या पावसात भरलेल्या शेततळे तसेच नदी, नाल्यांतील पाण्यावरून पुन्हा या दाेन पक्षांमध्ये वाक‌्युद्ध सुरु झाले अाहे.
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्तच्या कामांचे काैतुक करत फाेटाेसह व्टिट केल्यानंतर अाता सेनेनेही त्याला उत्तर देत परंडा येथील उल्फा नदीला मान्सून पूर्व पावसाने अालेल्या पूराचे फाेटाे व्टिट‌्वर टाकलेत. याला शिवजलक्रांती असे नामकरणही करण्यात अालेय. 

मुळात दुष्काळाने हाेरपळून निघालेल्या महाराष्ट्राला विशेषकरून मराठवाड्यातील शेतकरी या पावसाने सुखावला अाहे. असे असताना समाधान अाणि अानंद व्यक्त करायचे साेडून राज्यातील दाेनही प्रबल पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत लाेकांचा अानंद कमी करण्याचा घाट घालत अाहेत. 

मुळात राज्यात जलयुक्तची कामंच झालेली नव्हती यामुळे राज्यावर मागील कैक वर्षांपासून जलसंकट हाेतं. यंदा मुख्यमंत्र्यांनी जातीनं यात लक्ष घालून ती कामं राज्यात करून घेतली. यात मराठवाड्यावर सरकारचा अधिक फाेकस हाेता. याचा परिणाम अाता कुठं दिसू लागला असतानाच त्याच्या श्रेयावरून भांडणं कितपत याेग्यय?
यंदा पाऊस सरासरीपेक्षाही जास्त असल्याचे दावे केले जाताहेत. असे असताना जागाेजाग केलेल्या शेततळे तसेच जलयुक्तच्या कामांमुळे जर देव न कराे अाणि महापूराचे संकट अाले तर सेना किंवा मुख्यमंत्री घेणार का त्याची जबाबदारी?

Wednesday, June 8, 2016

चीनला चिमटा अन‌् पाकिस्तानला बुक्की



माेदींनी जणू अश्वमेध यज्ञच अारंभ केला अाहे. ते सध्या पाच देशांच्या दाैऱ्यावर असून, या दाैऱ्यात त्यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांनी चीनला सतत चिमटे घेणे सुरू केले अाहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्येही अस्वस्थतेचे वातावरण अाहे. अांतरराष्ट्रीय समुदायात भारताची शांत देश अशी प्रतिमा जपण्याच्या नादात अातापर्यंत अालेल्या सरकारने अनेकदा संयमाची भूमिका घेतली हाेती. यामुळे पाकिस्तानसाेबतच चीनचेही दरवेळी फावले हाेते. परंतु, पठाणकाेट हल्ल्यानंतर माेदी काहीसे अाक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून येत अाहे. 

मुळात माेदी सत्तेवर अाल्यानंतर त्यांच्या प्रतिमेप्रमाणे त्यांचे धाेरणही अाक्रमकच असेल असे अनेकांना वाटले हाेते. पहिल्या काही दाैऱ्यांमध्ये त्यांनी केलेल्या जबरदस्त प्रसिद्धीमुळे अनेक अंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्यांची तशीच दखल घेतली. काही प्रसंगी तर माेदींची पाकमधील सत्ताधीशांची तुलना करत पाकिस्तानी वर्तमानपत्रांनीही माेदींचे हात अाखडते घेत का हाेईना परंतु, गुणगान केले. माेदींनी काय केले हे तेच जाणाेत. परंतु, त्यांनी कसे केले याला अाता अधिक महत्त्व प्राप्त झाले अाहे. 
 
माेदींच्या प्रत्येक हालचालींवर सध्या अांतरराष्ट्रीय समुदायाचे बारीक लक्ष अाहे. याचाच भाग म्हणून माेदी जिथे जातात तिथे त्यांच्या विषयीच्या बातम्यांना वर्तमानपत्रात चांगली जागा मिळते. सध्या माेदी पाच देशांच्या दाैऱ्याच्या माध्यमातून ३३ हजार किलाेमीटरचा प्रवास करत अाहेत. माेदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अात्तापर्यंत २० परदेशी दाैरे केले असून, या माध्यमातून त्यांनी ४० देशांना भेटी दिल्या अाहेत. 

या दाैऱ्यातील माेदींच्या अखेरच्या पडावात सध्या ते अमेरिकेत असून, या भेटीत अमेरिकेने भारताच्या बाजूने उघड-उघड बाजू घेतली अाहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने ३४ देशांच्या मिसाईल टेक्नाॅलाॅजी कंट्राेल रिजीम (MTCR) मध्ये भारताचा समावेश केला अाहे.  मागील कैक वर्षांपासून या चमूमध्ये भारताचा समावेश असावा म्हणून भारत प्रयत्नशील हाेता.  भारताचा या चमूमध्ये समावेश झाल्याने भारतासाठी अनेक संधीची दारं उघडी झाली अाहेत. जपान, अाॅस्ट्रेलिया, अमेरिका सारखे दिग्गज देश यात अाहेत. 

अाेबामा म्हणा किंवा अमेरिका या देशाने भारताला सपाेर्ट करण्यामागे काहीतरी हेतू नक्कीच अाहे. भारताची अाशियातील शक्ती वाढत अाहे. इतर देशांशीही भारताचे चांगले संबंध अाहेत. अमेरिकेची अार्थिक स्थिती सध्या ढासाळलेली अाहे. 

भारतातील अमेरिकेचा व्यापार पहाता भारताशी चांगले संबंध ठेवण्याशिवाय अमेरिकेपुढे दुसरा पर्याय नाही. यातच चीनशी दाेन हात करायचे झाल्यास भारताच्या भूमिशिवाय दुसरा काेणताही पर्याय अमेरिकेपुढे नाही. त्यामुळे अाता माेदींनीही अमेरिकेच्या परिस्थितीचा फायदा उचलण्यास प्रारंभ केला अाहे. इतके दिवस अमेरिका दाेन दगडांवर पाय ठेऊन चालत हाेता. एकीकडे भारताला मदत करायची तर दुसरीकडे पाकलाही कुरवाळायचे. अाता अमेरिकेने उघड-उघड पाकविराेधात भूमिका घेण्यास सुरुवात केली अाहे. अागामी काळात काही माेठ्या घडामाेडी हाेण्याचेच हे संकेत अाहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.