Monday, September 19, 2016

जग पुन्हा अशांततेच्या उंबरठ्यावर; CPR नवे समीकरण



जग पुन्हा एकदा अशांततेच्या उंबरठ्यावर उभे अाहे. मागील काही दिवसांच्या जागतिक घडामाेडी पहाता सध्या तरी असेच म्हणावे लागेल.  मित्राचा मित्र ताे अापला मित्र अाणि शत्रूचा शत्रू ताे अापला शत्रू ही जगरहाटीची संकल्पना अाता कधीचीच मागे पडली अाहे. नवीन जागतिक समिकरणं पहाता अागामी काळात जागतिक पातळीवर नवीन बदल हाेऊ पहात असून, याला अभद्र युती म्हटले तरी हरकत नाही.

जगावर अधिराज्य गाजविण्याच्या नादात जग यापूर्वीच दाेन महायुद्धांनी हाेरपळून निघालेले अाहे. अगामी तिसरे महायुद्ध पाण्यामुळे हाेईल असे तर्क अांतरराष्ट्रीय तज्ज्ञांतर्फे वर्तवले जात अाहेत. अशातच पुन्हा एकदा चीन, अमेरिका, रशिया या बलाढ्य मानल्या जाणाऱ्या देशांच्या महत्त्वाकांक्षा उंचावत चालल्याने अांतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये कमालीची अस्वस्थता अाहे.

अमेरिका-रशिया, अमेरिका-चीन, रशिया-चीन, रशिया-पाकिस्तान, पाकिस्तान-भारत, भारत-चीन या देशांमधील वाद हा सर्वश्रूत अाहे. पाकिस्तान-भारत, अमेरिका-रशिया, अमेरिका-चीन या देशांतून तर विस्तवही जात नाही असे म्हणतात. व्यापार, खेळ, शिक्षण, संरक्षण एखाद्या देशावर अाेढवलेली नैसर्गिक अापत्ती त्यात या देशांनी पुढाकार घेत केलेली भरघाेस मदत अशा विविध माध्यमातून हे देश एकमेकांना कमीपणा देत स्वत:ची टिमकी मिरवण्याचा प्रयत्न करतात.

अमेरिका अाणि रशियाचे पूर्वापार संबंध खराब अाहेतच. शित युद्धाच्या काळात हे दाेन देश एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी वाया जाऊ देत नसत. रशिया अाणि पाकिस्तानचे तसेच हाेते.  १९३९ ते ४५ दरम्यान दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातील देश दाेन भागात विभागले गेले हाेते. पहिला गट हा अमेरिकेला मदत करत तर दुसरा रशियाला. अमेरिकेला पाठींबा देत रशियाला विराेध करण्यामध्ये कधीकाळी पाकिस्तान पहिल्या क्रमांकवर हाेता. अमेरिकेने पाकिस्तानशी हातमिळवणी करत अफगाणिस्तानातून साेव्हिएत रशियन फाैजांना पिटाळून लावण्यासाठी जंग जंग पछाडले हाेते. अमेरिकेने या दरम्यान पाकिस्तानला हवी ती मदत केली. शस्त्र, पैसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवत अफगाणिस्तानातून रशियन सैन्यांचा पडाव करण्यासाठी अमेरिकेने पाकला रेड कार्पेट टाकले हाेते.

अशिया खंडात रशियाचा वाढता प्रभाव अमेरिकेला सहन हाेत नव्हता. या कालावधीत भारताने अमेरिकेशी वैर पत्करत छुप्या पद्धतीने रशियाचे समर्थन केले हाेते. अाता समीकरणे बदलली अाहेत. भारताचा परंपरागत मित्र असलेला रशिया अाता चीन अाणि पाकिस्तानकडे झुकताेय. तर कधीकाळी अमेरिकेची नाराजी अाेढावून घेत रशियाला मदत करणाऱ्या भारताचे व अमेरिकेचे सख्य वाढले अाहे.

नुकत्याच झालेल्या संरक्षण विषयक विविध करारांवरून अापल्याला हे दिसूनच येते.  कधीकाळी पाकला शत्रू राष्ट्र मानणाऱ्या रशियाने अाता या वर्षाच्या अखेरीस पाक सैन्यासाेबत लष्करी सराव करण्याचा निर्णय घेतला अाहे.  या निर्णयावर अद्याप रशियाकडून काेणतीही प्रतिक्रीया नसली तरी रशियातील पाकिस्तानचे उच्चायुक्त काजी खलीलुल्लाह यांनी या वृत्ताला दुजाेरा दिला अाहे.

दुसरीकडे कधीही एकमेकांमध्ये न येणाऱ्या रशिया अाणि चीन यांनीही नवीन अाघाडी स्थापण्याचा प्रयत्न सुरु केला असून, साऊथ चायना सीमध्ये रशिया अाणि चीनच्या नाैदलांमध्ये संयुक्त युद्ध सराव सुरु झाला अाहे. या अचानक सुरु झालेल्या युद्ध सरावामुळे अमेरिका अाणि जपानचे धाबे दणाणलेत.

जपान अाणि चीनमध्ये अनेकदा युद्धे झालीत. चीन मधील क्रांतीचा इतिहास पहाता चीन जपानला शत्रू राष्ट्रच मानते. यातच चीन, रशिया, पाकिस्तान या देशांमध्ये सलगी वाढल्याने अमेरिकेने अाशियात अापले स्थान अाणखी भक्कम करण्यासाठी भारताला गाेंजारण्यास सुरुवात केली अाहे. याचाच परिपाक म्हणून मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा अाणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वारंवार भेटी हाेत अाहेत.

चीनने पाकिस्तानात इकाॅनाॅमिक काॅरिडाेअरचे काम सुरू केले असून, चीनी अभियंते अाणि त्यांच्या चमूची सुरक्षा करण्यासाठी पाकने १५ हजारांवर सैनिक तैनात केलेत. यातच भारताने अमेरिकी सैन्याला भारतीय लष्करी तळांचा वापर करण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर अाता चीननेही पाकिस्तानसाेबत माेठा लष्करी करार केला अाहे.

यापूर्वीच चीन सातत्याने पाकिस्तानला शस्त्रास्त्र व अार्थिक मदत पुरवतच अाला अाहे. अाता भारत अाणि अमेरिकेचे संबंध अधीक दृढ हाेत असल्याने चीन अाणखीच बिथरला अाहे. यापूर्वी अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट असताना अमेरिका दाेनही दगडांवर हात ठेवत भारत व पाकिस्तानला खेळवत. परंतु, अाता अमेरिकेने उघड-उघड भारताची बाजूच घेण्यास अारंभ केल्याने चीननेही रशिया, पाकिस्तानला अाणखी जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. अागामी काळात या तीन देशांचे संयुक्तरित्या लष्करी सराव झाले तर अाश्चर्य वाटायला नकाे. यात अस्ट्राेलियाचाही समावेश हाेण्याची दाट शक्यता अांतरराष्ट्रीय तज्ज्ञांना वाटतेय.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने लादेनच्या शाेधात अाखलेल्या माेहिमा, इराक, अफगाणिस्तानातील युद्ध यामुळे अमेरिकेचे अार्थिक कंबरडे माेडलेय. अमेरिकेचे परंपरागत मित्र मानले जाणारे इंग्लंड, फ्रांन्स अाणि जर्मनी या देशांचीही अार्थिक घडी विस्कळीत झालीय. यामुळे अागामी काळात अशियातील सर्वात माेठी बाजारपेठ म्हणून अमेरिकेने भारताकडे अाशेने पहाण्यास सुरुवात केली अाहे. अमेरिकन कंपन्यांनाही वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठांकडून अाशा असल्याने त्यांनीही भारताशी संबंध बळकट करण्यासाठी अाेबामा प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली अाहे.

उत्तर काेरियानेही यात उडी घेतली अाहे.  मागील काही महिन्यांमध्ये उत्तर काेरियाने केलेले अण्वस्त्र परिक्षण हा याचाच एक भाग म्हणावा लागेल.  अमेरिकेने डाेळे दाखवल्यावरही उत्तर काेरिया न डगमगता अमेरिकेवरच डाेळे वटारताेय. उत्तर काेरियावर अनेक अार्थिक निर्बंध लादल्यावरही या गुढ देशाने अापला अण्वस्त्र विस्तार कार्यक्रम सुरूच ठेवलाय. चीननेही यावर अाक्षेप घेतला हाेता. मात्र, उत्तर काेरियाने त्याकडे दुर्लक्ष केले.  अन्यथा चीन, रशिया, पाकिस्तानच्या पंक्तीत उत्तर काेरियाचाही समावेश झाला असता.

यापूर्वी विभागल्या गेलेल्या देशांमध्ये अमेरिका अाणि रशिया असे दाेन बलाढ्य गट हाेत. अाता नवीन CPR असे नवीन समीकरण जन्माला येऊ घातले अाहे. अार्थिक सुबत्तेसाठी अाणि प्रगतीसाठी भारतही अमेरिकेच्या बाजूने जात रशियाकडे दुर्लक्ष करताेय. पण बदलत्या समीकरणांमुळे अाता भारतानेही जपून पावले ठेवणे गरजेचे अाहे. अमेरिकेचा या पूर्वीचा अनुभव चांगला नाही. अाताही पाकने रशियाशी संयुक्त लष्करी सराव करण्याचा निर्णय घेतल्याने अमेरिकेनेही सावध खेळी खेळत बलुचिस्तानबाबत अखंड पाकिस्तानचा नारा दिला अाहे. 

अांतरराष्ट्रीय पातळीवर वेगाने इतक्या घडामाेडी घडत असल्याने सीरियातील परिस्थीती, अायएसअायएसचा हाेणारा विस्तार याकडे साऱ्यांचीच डाेळेझाक हाेतेय. याचाच परिपाक म्हणून जग पुन्हा एकदा अशांततेच्या उंबरठ्यावर उभे अाहे.

Monday, June 13, 2016

साधू, सेना अन‌् मुख्यमंत्री




कधी तरी एक कथा एेकली हाेती. एक साधू नदीत शिष्यांसाेबत अांघाेळ करत असताे. त्याच्या पायाखाली नेमका एक खेकडा येताे. ताे साधू नम्रपणे त्या खेकड्याला उचलून पाण्याच्या बाहेर दूर साेडून येताे.  अापल्या शिष्यांच्या पायाखाली पुन्हा ताे खेकडा येऊ नये व त्याचे प्राण जाऊ नयेत एवढाच त्याचा ताे चांगला विचार. परंतु, बाहेर त्याला साेडताना नेमका ताे खेकडा त्या साधूच्या हातांना चावा घेताे. साधूंचे शिष्य हे सारं पहात असतात. परंतु, ताे साधू त्या खेकड्याला काेणतीही इजा न हाेऊ देता त्याला साेडून पुन्हा नदीत उतरताे. न राहून एक शिष्य शेवटी त्या साधूला विचारताेही ‘महाराज, त्या खेकड्याने अापल्या हाताचा चावा घेतला, अापण त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत हाेतात तरी ताे चावला, अापण तरी त्याचे प्राण वाचवलेत. त्यावर साधू महाराज उत्तरले, चावणे हा खेकड्याचा गुणधर्म अाहे. मनुष्याचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य.. त्याने त्याचे काम केले मी माझे काम केले. 
 
ही कथा अात्ता अाठवण्याचे कारण म्हणजे सध्या सेना-भाजपमध्ये सुरु असलेले वाक‌्युद्ध. सेना- भाजप युती ही काही अाजची नाही. मात्र, सध्या दाेनही पक्षांमध्ये सुखाचा संसार साेडून एकमेकांवर मिळेल तिथे चिमटे काढण्याचे प्रकार सुरु अाहेत. तर वरील गाेष्टीत जसे खेकडा गुणधर्म साेडत नाही तसे राजकारणीही अापला गुणधर्म साेडत नसल्याने ही कथा इथे नमूद करावी वाटली. 

माेदींवरून सुरू झालेले सेना-भाजपचे व्टिट‌् युद्ध संपत नाही ताेच अाता मान्सून पूर्व पडलेल्या पावसात भरलेल्या शेततळे तसेच नदी, नाल्यांतील पाण्यावरून पुन्हा या दाेन पक्षांमध्ये वाक‌्युद्ध सुरु झाले अाहे.
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्तच्या कामांचे काैतुक करत फाेटाेसह व्टिट केल्यानंतर अाता सेनेनेही त्याला उत्तर देत परंडा येथील उल्फा नदीला मान्सून पूर्व पावसाने अालेल्या पूराचे फाेटाे व्टिट‌्वर टाकलेत. याला शिवजलक्रांती असे नामकरणही करण्यात अालेय. 

मुळात दुष्काळाने हाेरपळून निघालेल्या महाराष्ट्राला विशेषकरून मराठवाड्यातील शेतकरी या पावसाने सुखावला अाहे. असे असताना समाधान अाणि अानंद व्यक्त करायचे साेडून राज्यातील दाेनही प्रबल पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत लाेकांचा अानंद कमी करण्याचा घाट घालत अाहेत. 

मुळात राज्यात जलयुक्तची कामंच झालेली नव्हती यामुळे राज्यावर मागील कैक वर्षांपासून जलसंकट हाेतं. यंदा मुख्यमंत्र्यांनी जातीनं यात लक्ष घालून ती कामं राज्यात करून घेतली. यात मराठवाड्यावर सरकारचा अधिक फाेकस हाेता. याचा परिणाम अाता कुठं दिसू लागला असतानाच त्याच्या श्रेयावरून भांडणं कितपत याेग्यय?
यंदा पाऊस सरासरीपेक्षाही जास्त असल्याचे दावे केले जाताहेत. असे असताना जागाेजाग केलेल्या शेततळे तसेच जलयुक्तच्या कामांमुळे जर देव न कराे अाणि महापूराचे संकट अाले तर सेना किंवा मुख्यमंत्री घेणार का त्याची जबाबदारी?

Wednesday, June 8, 2016

चीनला चिमटा अन‌् पाकिस्तानला बुक्की



माेदींनी जणू अश्वमेध यज्ञच अारंभ केला अाहे. ते सध्या पाच देशांच्या दाैऱ्यावर असून, या दाैऱ्यात त्यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांनी चीनला सतत चिमटे घेणे सुरू केले अाहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्येही अस्वस्थतेचे वातावरण अाहे. अांतरराष्ट्रीय समुदायात भारताची शांत देश अशी प्रतिमा जपण्याच्या नादात अातापर्यंत अालेल्या सरकारने अनेकदा संयमाची भूमिका घेतली हाेती. यामुळे पाकिस्तानसाेबतच चीनचेही दरवेळी फावले हाेते. परंतु, पठाणकाेट हल्ल्यानंतर माेदी काहीसे अाक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून येत अाहे. 

मुळात माेदी सत्तेवर अाल्यानंतर त्यांच्या प्रतिमेप्रमाणे त्यांचे धाेरणही अाक्रमकच असेल असे अनेकांना वाटले हाेते. पहिल्या काही दाैऱ्यांमध्ये त्यांनी केलेल्या जबरदस्त प्रसिद्धीमुळे अनेक अंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्यांची तशीच दखल घेतली. काही प्रसंगी तर माेदींची पाकमधील सत्ताधीशांची तुलना करत पाकिस्तानी वर्तमानपत्रांनीही माेदींचे हात अाखडते घेत का हाेईना परंतु, गुणगान केले. माेदींनी काय केले हे तेच जाणाेत. परंतु, त्यांनी कसे केले याला अाता अधिक महत्त्व प्राप्त झाले अाहे. 
 
माेदींच्या प्रत्येक हालचालींवर सध्या अांतरराष्ट्रीय समुदायाचे बारीक लक्ष अाहे. याचाच भाग म्हणून माेदी जिथे जातात तिथे त्यांच्या विषयीच्या बातम्यांना वर्तमानपत्रात चांगली जागा मिळते. सध्या माेदी पाच देशांच्या दाैऱ्याच्या माध्यमातून ३३ हजार किलाेमीटरचा प्रवास करत अाहेत. माेदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अात्तापर्यंत २० परदेशी दाैरे केले असून, या माध्यमातून त्यांनी ४० देशांना भेटी दिल्या अाहेत. 

या दाैऱ्यातील माेदींच्या अखेरच्या पडावात सध्या ते अमेरिकेत असून, या भेटीत अमेरिकेने भारताच्या बाजूने उघड-उघड बाजू घेतली अाहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने ३४ देशांच्या मिसाईल टेक्नाॅलाॅजी कंट्राेल रिजीम (MTCR) मध्ये भारताचा समावेश केला अाहे.  मागील कैक वर्षांपासून या चमूमध्ये भारताचा समावेश असावा म्हणून भारत प्रयत्नशील हाेता.  भारताचा या चमूमध्ये समावेश झाल्याने भारतासाठी अनेक संधीची दारं उघडी झाली अाहेत. जपान, अाॅस्ट्रेलिया, अमेरिका सारखे दिग्गज देश यात अाहेत. 

अाेबामा म्हणा किंवा अमेरिका या देशाने भारताला सपाेर्ट करण्यामागे काहीतरी हेतू नक्कीच अाहे. भारताची अाशियातील शक्ती वाढत अाहे. इतर देशांशीही भारताचे चांगले संबंध अाहेत. अमेरिकेची अार्थिक स्थिती सध्या ढासाळलेली अाहे. 

भारतातील अमेरिकेचा व्यापार पहाता भारताशी चांगले संबंध ठेवण्याशिवाय अमेरिकेपुढे दुसरा पर्याय नाही. यातच चीनशी दाेन हात करायचे झाल्यास भारताच्या भूमिशिवाय दुसरा काेणताही पर्याय अमेरिकेपुढे नाही. त्यामुळे अाता माेदींनीही अमेरिकेच्या परिस्थितीचा फायदा उचलण्यास प्रारंभ केला अाहे. इतके दिवस अमेरिका दाेन दगडांवर पाय ठेऊन चालत हाेता. एकीकडे भारताला मदत करायची तर दुसरीकडे पाकलाही कुरवाळायचे. अाता अमेरिकेने उघड-उघड पाकविराेधात भूमिका घेण्यास सुरुवात केली अाहे. अागामी काळात काही माेठ्या घडामाेडी हाेण्याचेच हे संकेत अाहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Tuesday, May 31, 2016

मना सज्जना...

नि:शब्द मनाच्या लहरी काय असतात ते स्वत:च्या मनात डाेकावल्याशिवाय अापल्याला कळणार नाही. शरिराला वेदना झाली की अापण विव्हळताे, खूप अाेरडताे, उपचारांची परिसिमा गाठण्याचाही प्रयत्न करताे. मात्र, मनाला झालेली इजा अापल्याला लवकर कळतच नाही. मन हे इतकं हळवं असतं की त्याची तुलनाच अापण कशाशीच करू शकत नाही..

सकाळी उठायला उशिर झाला तरी मन निरुत्साही हाेतं, अाॅफीसचा एखादा मेल (नकाे असलेला) अचानक पडला तरी मनाला वेदना हाेतात, गाडी चालू करताना पेट्राेल संपलेलं जाणवलं तरी मनालाच वेदना, बायकाेने डब्यात नावडती भाजी दिली तरी मनालाच ताण,,,,,, किती अाणि किती अापला अाणि मनाचा संबंध येताे...

म्हणतात अापण श्वासाशिवाय जगूच शकत नाहीत, पण मनाशिवाय तरी अापण कुठं जगू शकताे? त्याला अापली सारी गुपितं माहिती असतात.. ताे अापल्या प्रत्येक घटनेचा साक्षिदार असताे. घटक्यात ताे घरी फेरफटका मारून येताे तर घटक्यात ताे काॅलेजातले दिवस अाठवताे.

अाता या मनावर अापण किती ताण द्यायचा? अाणि का? काही झालं तरी अापलं एकच मन उदास झालंय.. भकास वाटतंय... पण मन तर फुलपाखरू अाहे. त्याला स्वच्छंद उडायला अावडतं... त्याला मनसाेक्त उसळायला अावडतं.. कुणी अावडतं भेटलं की ते खुलतं अाणि नावडतं भेटलं की एखाद्या काेमेजलेल्या फुलासारखं निपचित पडून रहातं....

अशा मनाला सदैव सकारात्मक विचारांची जाेड हवी अाहे. वाईट गाेष्टी हाेतातच म्हणून काय चांगल्या गाेष्टी हाेण्याच्या थांबत नाहीत. मनात जितकी उर्जा अाहे तितकेच त्याच्यात विषही अाहे. अापण काेणता प्याला निवडायचा हे अापल्यावर अवलंबून अाहे.

विषाचा प्याला काही जणांना चांगला वाटेलही.... परंतु, उर्जा अर्थात सकारात्मक विचारांचा प्याला घेतला तर ताे चिरकाळ टिकताे हेही तितकेच खरे... म्हणूनच मना सज्जना.......

Wednesday, February 24, 2016

सुषमा ‘स्मृती’



लाेकसभेत बुधवारी पुन्हा एकदा दुर्गावतार पहावयास मिळाला. प्रचंड अावेश, कमालीचा संताप, अापली भूमिका मांडण्याची तत्परता अाणि याच्या जाेडीला तितकाच संयम हे सारं काही लाेकसभेत एकाच खासदाराच्या अंगी असणं तसं फारसं क्वचितच दिसतं.

क्रिकेट अाणि फुटबाॅलच्या मैदानावर एखादवेळी कमी गाेंधळ हाेत असेल तितका किंवा त्यापेक्षाही अधिक गाेंधळ अापल्याला लाेकसभेमध्ये नजरेस पडताे, एेकावयास मिळताे. फारसा इतिहासात मी जाणार नाही किंवा डाेकावण्याचा माझा मुळीच मानस नाही. परंतु, विराेधकांची ताेंडं अात्मविश्वासाच्या बळावर कशापद्धतीने बंद करता येतात. अापण काेणतीही चूक केलेली नाही हे छातीठाेकपणे कसं सांगता येतं, विराेधक सत्तेवर असताना त्यांनी कसं देशाचं खाेबरं केलं, ते किती दळभद्री सरकार हाेतं हे एका महिला खासदाराने  अशा काही पद्धतीने देशापुढे मांडलं की, कदाचित याचा अंंदाजा त्यांच्या भाषणापूर्वीच अाल्याने विराेधकांनी सभात्याग केला हाेता.  

काही वर्षांपूर्वी विराेधी बाकावर बसताना भाजप नेत्या सुषमा स्वराज या अशा पद्धतीने भाषण करत अाणि त्यांच्या विराेधकांची ताेंडंच गप्प करत. बुधवारी सुषमांच्या ‘स्मृती’ पुन्हा एकदा जाग्या झाल्या. ज्या अावेशात, शुद्ध अाणि श्रवणीय हिंदीत सुषमा स्वराज लाेकसभेत भाषण करत ताेच अावेश अाणि अापला विषय मांडण्याचे तेच कसब स्मृती इराणी यांच्या भाषणातून दिसून अाले. 

सकाळपासूनच लाेकसभा अाणि राज्यसभेत हैदराबादेतील राेहीत वेमालु अाणि जेएनयूतील दहशतवादी घाेषणाबाजीवर घमासान सुरू हाेते. गाेंधळ हा लाेकसभेच्या पाचवीलाच पुजलेला त्यामुळे ताे हाेणे अपेक्षितच हाेत. मात्र, बुधवारी लाेकसभेत या दाेन विषयांवर जे काही सदस्य बाेलले त्यात काही सदस्यांचे भाषण खरंच अभ्यासपूर्ण वाटले.  काॅंग्रेसचे ज्याेतिरादित्य सिंधीया यांनी काॅंग्रेसची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांच्या भाषणात किंवा बाजू मांडण्यात काेणतीही धार दिसून अाली नाही. 

यानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाने अनेक काॅंग्रेस नेत्यांची बाेलती बंद झाल्याचे दिसले.  मध्येच राहुल गांधी उठून जाण्याची वेळ अाणि  ठाकूर यांनी अाराेपांच्या फैरी झाडण्यास सुरू केल्याची वेळ एकच अाल्याने काहीकाळ विराेधकांच्या खेम्यामध्ये शांतता हाेती. ठाकूर यांनी काही प्रश्न इतके ठासून विचारले की, लाेकसभेच्या कामकाज पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवण्यापुढे विराेधक त्यांच्या प्रश्नांना ताेंड देऊ शकले नाहीत. इथे ज्येष्ठ अाणि वरिष्ठ काॅंग्रेस नेत्यांचा हाेमवर्क कमी पडल्याचे दिसले. यानंतर  काहीकाळ शांततेत गेला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना कमी वेळ मिळाल्याने ते फारसे बाेलू शकले नाही, मात्र त्यांनी कमी वेळात प्रभावी भाषण केल्याचा केलेला प्रयत्न चांगला हाेता. 

यानंतर मात्र, मैदान गाजवले ते स्मृती इराणी यांनी. विराेधकांनी केलेल्या प्रत्येक अाराेपांना त्यांनी पुराव्यासह उत्तर दिले. त्यांचे भाषण इतके प्रभावी झाले की, विराेध करणे तर साेडाच अाता कदाचित विराेधकांना प्रश्न पडला असेल की त्यांना गुरुवारी पुन्हा संसदेत काय उत्तर द्यावे.  अाज बऱ्याच दिवसांनंतर लाेकसभेत गाेंधळासह पार पडलेली चर्चा मात्र ‘स्मृती’त राहणारी अाहे इतके मात्र निश्चित.
(इथे सुषमा यांच्या लाेकसभेतील उपस्थिती अाणि त्यांच्या भाषणांसाठी त्यांचा उल्लेख त्यांच्या स्मृती असा करण्यात अाला अाहे. मला विश्वास अाहे सुज्ञ वाचक तसाच अर्थ घेतील. )

Tuesday, February 23, 2016

काेण म्हणताे अायसीस भारतात नाही?


व्हाॅट‌्स अॅप मनाेरंजनाचं माेठं साधन झालं अाहे. म्हटलं तर याचा चांगला फायदाही करून घेता येताे. एखादी घटना घडली की तासाभरात त्याचा ऊहापाेह करणारी किंवा त्यावर मिश्किल भाष्य करणारी एखादी पाेस्ट यावर पडतेच. ज्यांना मनाेरंजन साेडून ज्ञानरंजन करायचे अाहे, अशांसाठीही अाजकाल व्हाॅट‌्स अॅप काेश महत्त्वाचे माध्यम बनत चालले अाहे. 

सकाळी असेच काही व्हाॅट‌्स अॅप पहाताना एक खूप चांगला विचार माझ्या माेबाईलमध्ये फिरत-फिरत अाला. ‘रामायणात दाेन व्यक्ती अशा हाेत्या, एक बिभीषण अाणि दुसरी कैकयी. बिभीषण रावणाच्या राज्यात राहूनही चांगला विचार करत अाणि कैकयी रामाच्या राज्यात राहूनही केवळ दुष्ट विचारांमध्येच रमत असे. दाेघांमध्येही शेवटपर्यंत बदल काही झाले नाहीत. म्हणजेच सारे काही विचारांवरच अवलंबून असते. सुधरणे अाणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असते. परिस्थितीवर नाही. ’ खरंच सुंदर पाेस्ट अाहे ही. 
 
विचारांवरून अाठवलं.. अशाच एका विचारांचं क्रूर वादळं संपूर्ण जगभरात गाेंधळ घालतयं. साेयीनुसार अापण त्याला अायसीस दहशतवादी संघटना असं नाव दिलंय. काही वर्षांपूर्वी अशाच एका क्रूर वादळाला अापण तालिबान या नावाने अाेळखायचाे. मध्यंतरी माध्यमांमध्ये खूप साऱ्या बातम्या येत. अाताही कधी-कधी एखादी सिंगल काॅलम पडलेली दिसतेच. भारतात अायसीस नाही. भारत अायसीसपासून सुरक्षित वगैरे..वगैरे.   

मी अायसीसचा उल्लेख विचारांचं वादळ असं केल्याने काहींना हे वाचताना अाश्चर्यकारक वाटेल. पण मुळात दहशतवाद हा काेणत्याही जाती-पातींशी बांधलेला नाही. ताे काेणत्याही धर्मातर्फे पुरस्कृत नाही. ती विचारधारा अाहे. क्रूर अाणि विक्षिप्त विचारधारा. महाभारत काळापासून ही विचारधारा जगावर वेळाेवेळी हावी हाेण्याचा प्रयत्न करते. काळानुरूप त्याला नवी अाेळख मिळते इतकेच. कधी ती तालिबान म्हणून अाेळखली जाते, कधी ज्यूंची निर्घुन हत्या करणाऱ्या हिटलरच्या रुपात ती वावरते तर कधी अायसीस म्हणून भल्या-भल्या देशांच्या मनात धडकी भरवते.
असाे. अशा संघटनांचा उदाेउदाे करणे अथवा त्या का उदयाला अाल्या, त्या कशा फाेफावत गेल्या हा माझ्या अाजच्या लेखाचा विषय नाही. तर हा दहशतवाद एक विचारधारा अाहे अाणि ताे प्रबळ बनत चालला अाहे असे मला वाटते. अापल्याकडे नेतेमंडळी दावे करतात, अायसीसचा भारतात प्रभाव नाही. 

दिल्लीतील निर्भयाचे प्रकरण, गाईचे मांस खाल्ले म्हणून कुटुंबावर हल्ला करून खातरजमा न करता एखाद्याचा बळी घेणं, एखाद्या तरुण मुलीची हत्या करून तिचे प्रेत उघड्यावर पडले असता सहा जणांनी तब्बल दाेन दिवस तिच्या प्रेतावर बलात्कार करणं, शेजारी जागा देत नाही म्हणून बारामती सारख्या गावात रस्त्यावर खेळणाऱ्या शेजाऱ्यांच्या मुलावर ट्रॅक्टर चढवत चिमुकल्याचा बळी घेणे इतकेच काय अारक्षणाची अवास्तव मागणी करत दाेन राज्य वेठीस धरत २० जणांचा बळी घेणं अाणि देशाचे ३४ हजार काेटी रुपयांचे नुकसान करणं  या साऱ्या घटना मला अायसीस विचारधारेच्याच वाटतात. मग अापण ठामपणे दावा कसा करू शकताे की, अायसीस भारतात नाही. अापला देश अाजही पवित्र अाहे. 

मुळात अापण एका विचारधारेचा विचार करतच नाही अाहाेत. अापण केवळ व्यक्ती केंद्रीत विचार करताेय. संस्था, संघटना केंद्रीत विचार करून काहीजण धर्माच्या चुलीवर राजकीय पाेळ्या भाजताहेत. मी वर दिलेल्या साऱ्या घटनांचा विचार करता अाणि अायसीसने कशा प्रकारे क्रूरपणे लाेकांच्या हत्या केल्या, लहान मुलांचे बळी घेतले, महिलांवर बलात्कार केले या साऱ्यांची तुलना केली तर मागील काही वर्षात अापल्या देशात झालेल्या काही घटना या अायसीस या दहशतवादी संघटनेने केलेल्या क्रूर घटनांपेक्षाही भयावह अाहेत. 
 
निर्भयाचे प्रकरण झाल्यानंतर देशभर अशा घटनांविराेधात, बलात्काऱ्यांविराेधात निषेध करण्यात अाला. परंतु यानंतरही अापल्या देशात अशा प्रकारच्या घटना थांबल्यात का? नाही. कारण अापण विचार मारत नाहीत. केवळ व्यक्तीला दाेष देत त्यांना मारण्याचे काम अापण करत अाहाेत.  हे कुठं थांबणार? कधी थांबणार? कसं थांबणार? याला केवळ एकच पर्याय अाहे. विचारांवर नियंत्रण, विचार बदलणे. विचार बदलला तरच अापली परिस्थिती बदलेल.