जग पुन्हा
एकदा अशांततेच्या उंबरठ्यावर उभे अाहे. मागील काही दिवसांच्या जागतिक घडामाेडी
पहाता सध्या तरी असेच म्हणावे लागेल.
मित्राचा मित्र ताे अापला मित्र अाणि शत्रूचा शत्रू ताे अापला शत्रू ही
जगरहाटीची संकल्पना अाता कधीचीच मागे पडली अाहे. नवीन जागतिक समिकरणं पहाता अागामी
काळात जागतिक पातळीवर नवीन बदल हाेऊ पहात असून, याला अभद्र युती म्हटले तरी हरकत
नाही.
जगावर
अधिराज्य गाजविण्याच्या नादात जग यापूर्वीच दाेन महायुद्धांनी हाेरपळून निघालेले
अाहे. अगामी तिसरे महायुद्ध पाण्यामुळे हाेईल असे तर्क अांतरराष्ट्रीय
तज्ज्ञांतर्फे वर्तवले जात अाहेत. अशातच पुन्हा एकदा चीन, अमेरिका, रशिया या
बलाढ्य मानल्या जाणाऱ्या देशांच्या महत्त्वाकांक्षा उंचावत चालल्याने
अांतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये कमालीची अस्वस्थता अाहे.
अमेरिका-रशिया,
अमेरिका-चीन, रशिया-चीन, रशिया-पाकिस्तान, पाकिस्तान-भारत, भारत-चीन या देशांमधील
वाद हा सर्वश्रूत अाहे. पाकिस्तान-भारत, अमेरिका-रशिया, अमेरिका-चीन या देशांतून
तर विस्तवही जात नाही असे म्हणतात. व्यापार, खेळ, शिक्षण, संरक्षण एखाद्या देशावर
अाेढवलेली नैसर्गिक अापत्ती त्यात या देशांनी पुढाकार घेत केलेली भरघाेस मदत अशा
विविध माध्यमातून हे देश एकमेकांना कमीपणा देत स्वत:ची टिमकी मिरवण्याचा प्रयत्न
करतात.
अमेरिका
अाणि रशियाचे पूर्वापार संबंध खराब अाहेतच. शित युद्धाच्या काळात हे दाेन देश
एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी वाया जाऊ देत नसत. रशिया अाणि पाकिस्तानचे
तसेच हाेते. १९३९ ते ४५ दरम्यान दुसऱ्या
महायुद्धानंतर जगभरातील देश दाेन भागात विभागले गेले हाेते. पहिला गट हा अमेरिकेला
मदत करत तर दुसरा रशियाला. अमेरिकेला पाठींबा देत रशियाला विराेध करण्यामध्ये कधीकाळी
पाकिस्तान पहिल्या क्रमांकवर हाेता. अमेरिकेने पाकिस्तानशी हातमिळवणी करत
अफगाणिस्तानातून साेव्हिएत रशियन फाैजांना पिटाळून लावण्यासाठी जंग जंग पछाडले
हाेते. अमेरिकेने या दरम्यान पाकिस्तानला हवी ती मदत केली. शस्त्र, पैसा,
अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवत अफगाणिस्तानातून रशियन सैन्यांचा पडाव करण्यासाठी
अमेरिकेने पाकला रेड कार्पेट टाकले हाेते.
अशिया
खंडात रशियाचा वाढता प्रभाव अमेरिकेला सहन हाेत नव्हता. या कालावधीत भारताने
अमेरिकेशी वैर पत्करत छुप्या पद्धतीने रशियाचे समर्थन केले हाेते. अाता समीकरणे
बदलली अाहेत. भारताचा परंपरागत मित्र असलेला रशिया अाता चीन अाणि पाकिस्तानकडे झुकताेय.
तर कधीकाळी अमेरिकेची नाराजी अाेढावून घेत रशियाला मदत करणाऱ्या भारताचे व
अमेरिकेचे सख्य वाढले अाहे.
नुकत्याच
झालेल्या संरक्षण विषयक विविध करारांवरून अापल्याला हे दिसूनच येते. कधीकाळी पाकला शत्रू राष्ट्र मानणाऱ्या रशियाने
अाता या वर्षाच्या अखेरीस पाक सैन्यासाेबत लष्करी सराव करण्याचा निर्णय घेतला
अाहे. या निर्णयावर अद्याप रशियाकडून
काेणतीही प्रतिक्रीया नसली तरी रशियातील पाकिस्तानचे उच्चायुक्त काजी खलीलुल्लाह
यांनी या वृत्ताला दुजाेरा दिला अाहे.
दुसरीकडे
कधीही एकमेकांमध्ये न येणाऱ्या रशिया अाणि चीन यांनीही नवीन अाघाडी स्थापण्याचा
प्रयत्न सुरु केला असून, साऊथ चायना सीमध्ये रशिया अाणि चीनच्या नाैदलांमध्ये
संयुक्त युद्ध सराव सुरु झाला अाहे. या अचानक सुरु झालेल्या युद्ध सरावामुळे
अमेरिका अाणि जपानचे धाबे दणाणलेत.
जपान अाणि
चीनमध्ये अनेकदा युद्धे झालीत. चीन मधील क्रांतीचा इतिहास पहाता चीन जपानला शत्रू
राष्ट्रच मानते. यातच चीन, रशिया, पाकिस्तान या देशांमध्ये सलगी वाढल्याने
अमेरिकेने अाशियात अापले स्थान अाणखी भक्कम करण्यासाठी भारताला गाेंजारण्यास
सुरुवात केली अाहे. याचाच परिपाक म्हणून मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा अाणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या
वारंवार भेटी हाेत अाहेत.
चीनने
पाकिस्तानात इकाॅनाॅमिक काॅरिडाेअरचे काम सुरू केले असून, चीनी अभियंते अाणि
त्यांच्या चमूची सुरक्षा करण्यासाठी पाकने १५ हजारांवर सैनिक तैनात केलेत. यातच
भारताने अमेरिकी सैन्याला भारतीय लष्करी तळांचा वापर करण्यास हिरवा कंदील
दिल्यानंतर अाता चीननेही पाकिस्तानसाेबत माेठा लष्करी करार केला अाहे.
यापूर्वीच
चीन सातत्याने पाकिस्तानला शस्त्रास्त्र व अार्थिक मदत पुरवतच अाला अाहे. अाता
भारत अाणि अमेरिकेचे संबंध अधीक दृढ हाेत असल्याने चीन अाणखीच बिथरला अाहे. यापूर्वी
अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट असताना अमेरिका दाेनही दगडांवर हात ठेवत भारत व
पाकिस्तानला खेळवत. परंतु, अाता अमेरिकेने उघड-उघड भारताची बाजूच घेण्यास अारंभ
केल्याने चीननेही रशिया, पाकिस्तानला अाणखी जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. अागामी
काळात या तीन देशांचे संयुक्तरित्या लष्करी सराव झाले तर अाश्चर्य वाटायला नकाे.
यात अस्ट्राेलियाचाही समावेश हाेण्याची दाट शक्यता अांतरराष्ट्रीय तज्ज्ञांना
वाटतेय.
वर्ल्ड
ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने लादेनच्या शाेधात अाखलेल्या
माेहिमा, इराक, अफगाणिस्तानातील युद्ध यामुळे अमेरिकेचे अार्थिक कंबरडे माेडलेय.
अमेरिकेचे परंपरागत मित्र मानले जाणारे इंग्लंड, फ्रांन्स अाणि जर्मनी या
देशांचीही अार्थिक घडी विस्कळीत झालीय. यामुळे अागामी काळात अशियातील सर्वात माेठी
बाजारपेठ म्हणून अमेरिकेने भारताकडे अाशेने पहाण्यास सुरुवात केली अाहे. अमेरिकन
कंपन्यांनाही वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठांकडून अाशा असल्याने त्यांनीही
भारताशी संबंध बळकट करण्यासाठी अाेबामा प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली
अाहे.
उत्तर
काेरियानेही यात उडी घेतली अाहे. मागील
काही महिन्यांमध्ये उत्तर काेरियाने केलेले अण्वस्त्र परिक्षण हा याचाच एक भाग
म्हणावा लागेल. अमेरिकेने डाेळे
दाखवल्यावरही उत्तर काेरिया न डगमगता अमेरिकेवरच डाेळे वटारताेय. उत्तर काेरियावर
अनेक अार्थिक निर्बंध लादल्यावरही या गुढ देशाने अापला अण्वस्त्र विस्तार
कार्यक्रम सुरूच ठेवलाय. चीननेही यावर अाक्षेप घेतला हाेता. मात्र, उत्तर
काेरियाने त्याकडे दुर्लक्ष केले. अन्यथा
चीन, रशिया, पाकिस्तानच्या पंक्तीत उत्तर काेरियाचाही समावेश झाला असता.
यापूर्वी
विभागल्या गेलेल्या देशांमध्ये अमेरिका अाणि रशिया असे दाेन बलाढ्य गट हाेत. अाता
नवीन CPR असे नवीन समीकरण जन्माला येऊ घातले अाहे. अार्थिक सुबत्तेसाठी अाणि
प्रगतीसाठी भारतही अमेरिकेच्या बाजूने जात रशियाकडे दुर्लक्ष करताेय. पण बदलत्या
समीकरणांमुळे अाता भारतानेही जपून पावले ठेवणे गरजेचे अाहे. अमेरिकेचा या पूर्वीचा
अनुभव चांगला नाही. अाताही पाकने रशियाशी संयुक्त लष्करी सराव करण्याचा निर्णय
घेतल्याने अमेरिकेनेही सावध खेळी खेळत बलुचिस्तानबाबत अखंड पाकिस्तानचा नारा दिला
अाहे.
अांतरराष्ट्रीय
पातळीवर वेगाने इतक्या घडामाेडी घडत असल्याने सीरियातील परिस्थीती, अायएसअायएसचा
हाेणारा विस्तार याकडे साऱ्यांचीच डाेळेझाक हाेतेय. याचाच परिपाक म्हणून जग पुन्हा
एकदा अशांततेच्या उंबरठ्यावर उभे अाहे.