Thursday, November 26, 2015

अामिरची वैचारिक दिवाळखाेरी

चित्रपट सृष्टीतील कलावंतांचे एक वेगळेच विश्व असते. त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांनी बाेललेला प्रत्येक शब्द हा प्रमाण शब्द असताे. ते जसे वागतात, जसे बाेलतात, जे खातात, जे पेहराव परिधान करतात, त्याच प्रमाणे त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्या चाहत्यांकडून केला जाताे. अादर्श व्यक्ती ठरवण्याची पद्धत तरी भारतात वर्षानुवर्षे अशीच चालत अालेली अाहे.

भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास तसा फारसा जुना नाही. मात्र, चित्रपट सृष्टी अाणि सध्या बाॅलीवुड म्हणून नावारुपाला अालेल्या बाॅलीवुडमधील तारे-तारकांना अाजही अापला प्रतिस्पर्धी कलावंत पुढे जात असलेले पहावत नाही. सुरुवातीलपासूनच या क्षेत्राला लागलेला हा शाप अाहे. खुप थाेडे नट-नट्या असे अाहेत जे या क्षेत्रात केवळ अभिनय करण्यासाठी येतात. अनेकांना या क्षेत्राची भुरळ असते. अनेकांना छंद असताे. अनेकांची जिद्द असते तर काहींना शाैक असताे. बाॅलीवुडमध्ये वैचारिक श्रीमंती असणारे फार थाेडे कलावंत अाहेत. त्या माेजक्यांपैकी एक मानला जायचा ताे अामिर खान.

माेठ माेठाले अवाॅर्ड, पार्ट्या यापासून साेयिस्करपणे स्वत:ला दूर ठेवत अामिरने त्याच्या चाहत्यांमध्ये वेगळी इमेज निर्माण केली अाहे. लगान सारखा चित्रपट असाे किंवा सरफराेश सारख्या चित्रपटात त्याने केलेला अभिनय असाे, अामिर हा वेगळाच अाहे. मिस्टर परफेक्टनिस्ट अशी त्याची अाेळख अाहे. परंतु, अचानक त्याने केलेल्या एका विधानाने त्याची कैक वर्षांची अाेळख पुसून काढली अाहे.

भारतात असहिष्णूतेचे वातावरण अाहे. माझी बायकाे देश साेडून जाण्याबाबत मला विचारत हाेती असे वक्तव्य त्याने केले अाणि झाले..... ताे या वादळात अडकला. मुळात अशा प्रकारचे तथ्यहिन वक्तव्य करण्याची गरजच त्याला नव्हती.

अामिर लहानाचा माेठा झाला अाणि बाॅलिवुडमध्ये स्टार झाला ताे याच देशात. त्याच्या चित्रपटांना चाहत्यांनी दिलेली दाद, त्याच्या कलेला चाहत्यांनी डाेक्यावर घेतले. अाज अामिर हे सारे का विसरला? याचे उत्तर सध्यातरी एकच दिसतेय. ‘दंगल’ डिसेंबरमध्ये त्याचा डिसेंबर हा चित्रपट प्रदर्शित हाेणार अाहे. या चित्रपटाच्या नादात त्याने नकाे त्या प्रकरणात अक्कल पाजळण्याचा प्रयत्न केला. एक ‘दंगल’ यशस्वी करण्यासाठी त्याने दुसरी ‘दंगल’ निर्माण केली. सध्या तरी त्याने निर्माण केलेली दंगल ही वैचारिक स्वरुपाची अाहे.

चित्रपट यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करायची व चर्चेत रहायचे असा बाॅलिवुडचा अघाेषीत नियम अाहे. या नियमात अामिर कुठेच बसत नव्हता. किंबहुना त्याने अशा प्रकारचा प्रयत्न या पूर्वी केलाच नव्हता. मग प्रश्न उपस्थित हाेताे, अाताच का?

बाॅलिवुडमध्ये मागील काही दिवसांपासून काॅम्पिटीशन जबरदस्त वाढली अाहे. दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लाेकप्रियता हे या मागील मुळ कारण अाहे. बाहुबली या चित्रपटाने सारे विक्रम माेडीत काढल्याने बाॅलिवुडमधील निर्मात्याचे धाबे चांगलेच दणाणलेत. त्यातही बजरंगी भाईजानलाही चांगली लाेकप्रियता मिळाली. अाता शाहरुखचाही डीडीएलजे पुन्हा पार्ट-२ रुपात येताेय... या साऱ्यात अामिर खान याला असुरक्षित वाटणे सहाजिक अाहे. ताे देशात असुरक्षित नाही ताे बाॅलिवुडमध्ये स्वत:ला असुरक्षित मानताेय.

वर्षात एकच चित्रपट करायचा अाणि त्याचे यश म्हशीसारखे वर्षभर पचवायचे अशांच्या यादीमध्ये अामिर खान माेडताे.  परंतु, अाता त्याला असहिष्णुतेची जाणीव हाेतेय ती बाॅलिवुडमध्ये. ताे इतर चित्रपटांच्या यशाने डिस्टर्ब झाला अाहे.

याचा परिणाम त्याच्या शांत व सुस्वभावी वृत्तीवर झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वैचारिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या अामिरची बाैद्धिक दिवाळखाेरी त्याने माध्यमांपुढे अाणली अाणि ती माध्यमांनी त्याच्या चाहत्यांच्या पुढ्यात जशीच्या तशी मांडली. अाता किमान महिना दीड महिना तरी हे प्रकरण चालणार. ताेपर्यंत त्याचा चित्रपट तयार हाेईलच.

‘सत्यमेव जयते’मध्ये परिस्थितीशी झगडणारा अामिर सगळ्यांनी पाहिला हाेता. त्याचे परिवर्तन अाता स्वत:च्या चित्रपटासाठी पब्लिसीटी स्टंट करणाऱ्या अामिरमध्ये झालेे अाहे. अामिरचा किरण रावशी दुसरा विवाह झाला अाहे. मुळात किरण राव या हिंदू अाहेत अामिर खान हा धर्माने मुस्लिम अाहे. ताे त्या धर्माचा असतानाही किरण रावने त्याच्याशी विवाह अाणि ताेही दुसरा विवाह केला तेंव्हा हा देश असहिष्णू का सहिष्णू हे अामिरला समजले नाही का? ताे खान असतानाही त्याला ८४% हिंदू असलेल्या भारतीयांनी डाेक्यावर घेतले. त्याच्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला. तेव्हा अामिर तंदुरी भाजत हाेता का?

मुंबईवर झालेला माेठा दहशतवादी हल्ला असाे किंवा काश्मिरात हाेणाऱ्या दंगली व दहशतवादी हल्ले, अामिरला कधीच या विषयी बाेलावे का वाटले नाही? त्यानेच उत्तर द्यावे.

Thursday, August 13, 2015

राहुल माेठे कधी हाेणार

थाेर महात्मे हाेऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा....
अापण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बाेध खरा....
लाेकमान्य टिकळ म्हणतात, स्वराज्य माझा, जन्म सिद्ध हक्क अाहे अाणि ताे मी मिळवणारच.

माझ्या मुलाच्या शाळेमध्ये एक स्लाेगन स्पर्धा हाेती. त्याला त्याच्या अाईने अर्थात माझ्या पत्नीने या अाेळी सांगीतल्या अाणि त्याचे पाठांतर करवून घेतले. त्याने तितक्याच सुरेख पद्धतीने या अाेळी पाठ केल्या अाणि शाळेत धडाधडा एकदाच्या म्हटल्याही... मुलगा अाताकुठे ज्युनीअर केजीमध्ये अाहे. पण त्याने पाठ केलेल्या अाेळी त्याच्या मानाने तशा अवघडच हाेत्या. पाठांतर झाले की अापण काहीही बेधडकपणे अाणि ठामपणे बाेलू शकताे हा मानवी गुण असल्याचे माझ्या मुलाने पुन्हा एकदा सिद्ध केले.


हिच सिद्धता मला काॅंग्रेसचे नेते अाणि गांधी कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय चालवणाऱ्या राहुल गांधी यांच्या भाषणातून काल जाणवली. मागील काही दिवसांपासून ललित माेदी प्रकरणात काॅंग्रेस अाणि विराेधकांनी ‘रान’ अाणि ‘रन’ दाेनीही माजवले अाहे. मंगळवारी राहुल गांधी यांनीही असेच काहीसे पाठांतर लाेकसभेत म्हणून दाखवले. ‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडून लाेकांना उत्तरे हवी अाहेत. त्यांनी लाेकसभेत माेदी (ललित) प्रकरणावर बाेलावे. लाेकांना माेदीजी एेवजी माैनीजी दिसत अाहेत. इतकेच काय तर माेदीजींना राहुल यांनी चक्क गांधीजींच्या तीन माकडांचेही उदाहरण दिले. तेच रटलेले बुरा मत देखाे, बुरा मत बाेलाे, बुरा मत सुनाे.


सुट्टांची तब्बल दाेन महिन्यांची मजा अाटाेपून अाल्यानंतर राहुल यांच्यातील प्रगल्भता काहीशी वाढली असेल असा अापल्याप्रमाणेच माझाही समज झाला हाेता. पण हा समज मंगळवारी राहुल यांनी केलेल्या पाठांतराच्या भाषणाने साफ खाेटा ठरवला अाहे. सुषमा स्वराज यांना विराेध का सरकारला विराेध या पेचात काॅंग्रेस पुन्हा एकदा अडकल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवत हाेते. अाता तर असाही अाराेप हाेत अाहे की, राहुल यांनी चक्क कागदावर हे स्लाेगन लिहून अाणले अाणि संसदेत ते बाेलले. अगदी माझ्या मुलाने त्याच्या शाळेतील स्लाेगन काॅम्पीटीशनमध्ये पाठांतर एेकवल्या प्रमाणे.


राहुल यांनी सुषमा स्वराज यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला खरा पण, त्यांच्या अावड्यात कार्टूनमध्ये ज्या प्रमाणे माेगलीने फेकलेला बुमरॅंग त्याच्या हातात परत येता. त्याच प्रमाणे सुषमा यांच्या भाषणाने राहुल गांधी यांचा बुमरॅंग काॅंग्रेसवर परत अाला अाहे. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्यासारखे दुसरे नेते काॅंग्रेसला मिळालेले नाहीत हे या भारतीय लाेकशाहीचे अाणि काॅंग्रेस पक्षाचे माेठे दुर्देव अाहे.  देशाचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी येथे भाष्य करण्याचे मी मुद्दाम टाळताे अाहे. नेहरू यांच्यामागे अनेक वाद-प्रतिवाद अाहेत. इंदिराजी अाणि राजीवजी यांच्या मागेही हे वाद अाहेतच पण त्यांनी किमान पक्षाची व देशाची वाताहत हाेऊ दिली नव्हती. असाे. राहुल यांच्या कमबॅकचा पुन्हा एकदा केलेला प्रयाेग गांधी कुटुंबिय अाणि काॅंग्रेसला चांगलाच महाग पडण्याची चिन्हे दिसून येत अाहेत.


एक काळ हाेता संसदेत अटलजींसारखा खंबीर विराेधीपक्ष नेता अापण पाहिला अाहे. भारतीय संसदेची ही नेहमीचीच बाेंब अाहे की चांगला विराेधीपक्ष संसदेला कधीच मिळू शकला नाही. (एखाद दुसरा अपवाद वगळता.)  अाता तर केवळ सरकारला विराेध करून अाक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न विराेधक करत अाहेत. असेच ललित माेदी नाट्यावरून सारे दिसत अाहे. हास्यास्पद बाब म्हणजे ललित माेदी प्रकरणावरून लाेकसभा मागील कैक दिवसांपासून ठप्प पडत असताना ताेच ललित माेदी म्हणताे, ‘मला कशाचेच टेन्शन नाही. ही तर मला सर्कस वाटतेय’ माेदी याचे हे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्यासारखे नसले तरी सामान्य भारतीयांच्या मनातील काॅंग्रेस अाणि विराेधी पक्षांबद्दलचा समज त्याने बाेलून दाखवला अाहे.

उधमपूरमध्ये पकडलेला पाकिस्तानी दहशतवादी नावेद, एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्याने भारतीय अाण्विक कार्यक्रमात निर्माण झालेली पाेकळी यासाऱ्यांना बगल देत मागील ६० ते ७० वर्ष राज्य केलेल्या काॅंग्रेस पक्षाला काेण कुठला ललित माेदी महत्त्वाचा वाटताेय. विराेध करणे हे विराेधी पक्षाचे काम अाहे. त्यांनी ते करावेच परंतु, अशा प्रकारचा वांझाेटा विराेध काय कामाचा.

स्व. पंतप्रधान राजीव गांधी, त्यांच्या पत्नी अाणि काॅंग्रेस अध्यक्षा साेनीया गांधी त्यानंतर त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यातील काॅमन गाेष्ट म्हणजे तिघांनाही राजकारणात रस नसताना केवळ कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय म्हणून त्यांना पक्षाने या जंजाळात अाेढले अाहे. राजीवजी यांनी इंदिराजींना राजकारणात येणार नाही असे ठामपणे सांगितले हाेते. त्यांनी इंदिराजी, तत्कालीन काॅंग्रेसचे नेते या साऱ्यांना विराेध केला हाेता. त्याहीवेळी राजीव काे लाअाेचे नारे पक्षांतर्गत लागलेले जुने जाणकार सांगतातच. साेनियांच्या बाबतीतही तेच झाले. राजीवजींच्या निधनानंतर कैकवर्ष साेनिया राजकारणापासून दूर हाेत्या. राहुल यांनाही त्यांनी दूर ठेवणेच पसंद केले हाेत.. इतकेच काय तर राहुल यांनीही अापली अाई काॅंग्रेसच्या मेन स्ट्रीममध्ये असेपर्यंत ‘नाे पाॅलिटिक्स’ हे स्लाेगन सतत वाचलेले अापल्याला अाठवत असेल. पण शेवटी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे दडपण, वंशपरंपरागत व्यवसायाच्या नावाखाली ज्यांना राजकारणाचा गंधही नाही अशा या माय-लेकराला राजकारणात अाेढले गेले.

अाज मागील कित्येक दिवसांपासून अापण पहाताेय सातत्याने राहुल गांधी यांना देशातील सर्वात माेठा नेता बनवण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जाताेय. पण त्याला काही केल्या यश येत नाही. याला कारणही तसेच अाहे. ‘जर अाडातच नाही तर पाेहऱ्यात कुठून येणार?.’  या खेळात काॅंग्रेसच्या प्रयाेगशाळेमुळे देशाचे माेठे नुकसान हाेतेय हे पक्षातील नेत्यांना का समजत नाही. का समजत असूनही डाेळे बंद करून ते दुध पिण्याचे काम करत अाहेत. काॅंग्रेसचे नेते अाणि अापले विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हेही काॅंग्रेसचे एकेकाळी पावरबाज नेते म्हटले जात. कदाचित तेही याला कंटाळले असतील व जेव्हा मनमाेहन सिंग यांना बदलण्याची मागणी केली जात हाेती तेव्हा त्यांनीही राष्ट्रपती बनण्याची इच्छा व्यक्त केली असेल. प्रणबजी हे अत्यंत खंबीर नेते मानले जातात. ते अत्यंत अभ्यासूही अाहेत. राजकारणातील त्यांचा गाढा अभ्यास अाहे. जेव्हा केव्हा देशावर व सरकारवर संकट अाले (काॅंग्रेसच्या काळात) तेव्हा प्रणबजींचा सल्ला घेतला जात. त्यांनी दिलेल्या निर्णयावरूनच पुढील अादेश दिले जात. अाता सारे काही ठप्प. कदाचित दूरदृष्टी असलेल्या प्रणबजींना हे तेव्हाच कळाले असेल अाणि म्हणूनच त्यांनी काॅंग्रेस अाणि राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असावा.

दरवेळेला पराभव झाल्यानंतर दाेन महिन्यांचे अात्मचिंतन देशाला परवडणारे नाही. याने देशाच्या नागरिकांवर तर अन्याय हाेताेचय परंतु, शत्रु राष्ट्रही याची मजा लुटत अाहेत. अाता परिस्थिती बदलली अाहे. माेदी सरकार सत्तेवर अापल्यापासून इतर राष्ट्रांमध्ये भारताचा दबदबा वाढताे अाहे. असे असताना देशांतर्गत सुरु असलेल्या ‘ललित’ नाट्यामुळे देशाचे काेट्यवधीचे नुकसान तर हाेतेच अाहे शिवाय देशाची पतही खराब हाेतेय. एक-दाेन नाही तर तब्बल दाेन महिन्यांपासून अापण संसदेतील हा खेळ पहाताेय. देशाच्या इतिहासात प्रथमच लाेकसभा अध्यक्षांना ‘ही लाेकशाहीची हत्या अाहे’ असे म्हणावे लागले अाणि संपूर्ण देशाने ते पाहिले.

राहिला प्रश्न राहुल बाबांचा तर काॅंग्रेसने त्यांना राजकीय नेता प्रेझेंट करण्यापेक्षा एखादी माेठी मल्टीनॅशनल कंपनी काढून द्यावी अाणि सीईअाे म्हणून तिथे त्यांची नियुक्ती करावी हेच अाता याेग्य ठरेल असे म्हणण्याची वेळ अाली अाहे. पंतप्रधान माेदी यांनी बांगलादेशसाेबत नुकताच केलेला सिमांबाबतचा करार हा अत्यंत दूरदृष्टीने घेतलेला निर्णय अाहे. या साऱ्या गाेंधळामुळे याकडे कुणाचेच लक्ष नाही. अशा निर्णयाने पाकिस्तान अाणि चीनही हादरलेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच एखाद्या राष्ट्राला अापण अापली गावे दिलीत अाणि त्याने त्यांची गावे अापल्यात विलीन केलीत. पण ज्याला देशाचा इतिहासच माहित नाही त्या राहुल गांधी यांना हा करार काय कळायचा?.
राहुल गांधी यांचा राजकारणाला विराेध अाहे पण राजकारणात येण्यासाठी नाही. हे त्यांनीच कबुल केले अाहे. दिल्लीतील काेलंबस स्कूल, प्रसिद्ध दून विद्यालयात प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर राहुल यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या फ्लाेरिडा येथील राेलिंस काॅलेजातून पदवी घेतली. यानंतर त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनीटी काॅलेजातून एम.फिलही पूर्ण केले.

खूप कमी जणांना माहिती असेल की राहुल यांनी व्यवस्थापन गुरू मानल्या जाणाऱ्या मायकल पाेर्टर यांच्या माॅनीटर ग्रुपमध्ये काहीकाळ कामही केले अाहे. यानंतर बॅकअप्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले अाहे.  राहुल यांचा हा कार्यकाळ सांगण्याचे कारण म्हणजे २००४ मध्ये राहुल यांनी लाेकसभा निवडणूक लढवण्याची अधिकृत घाेषणा केली अाणि ते राजकारणात अाले. एक तपही राहुल यांनी अद्याप राजकारणात पूर्ण केलेले नाही. केवळ गरिबांच्या घरी जेवण केल्याने तसेच नुसते भारत भ्रमण केल्याने राजकारण समजत नाही. यासाठी राजकारणाचा पिंड लागताे. कुटुंबातील सर्वच जण एकच व्यवसाय असले तरी पुढच्या पिढ्यांना जर ताे व्यवसाय करावयाचा नसेल तर अनेकांनी अापले परंपरागत व्यवसाय साेडत अापल्याला ज्यात रस अाहे ते केल्याचे अापण पाहिले अाहे.

अशी अनेक उदाहरणे अाहेत. (त्यावर वेगळी चर्चा नकाे म्हणून त्यांचे उल्लेख इथे टाळत अाहे.) मध्यंतरी अमीर खानने एक चित्रपट काढला हाेता. ‘थ्री इडियट’ हा चित्रपट प्रचंड गाजला. अापल्या ज्यात रस नाही ताे व्यवसाय का करायचा हे त्याने यात मांडले हाेते. मुलांवर सक्ती करून डाॅक्टर, इंजिनिअर करण्याच्या नादात तुम्ही त्याचा अानंद हेरावून घेताय. यामुळे तुमचेच कुटूंब डिस्टर्ब हाेतेय हे त्याने यात मांडले हाेते. हा चित्रपट राहुल यांनीही पाहिल्याचे मी एेकले हाेते. यातील बाेध जर त्यांनी घेतला असता तर कदाचित अाज देशावर ही वेळ अाली नसती. राहुल यांना जर राजकारणात रसच नाही तर का अाणि काेण त्यांचे अाणि देशाचे करिअर खराब करण्याचा प्रयत्न करताेय? अाणि जर राहुल यांना राजकारणात रस निर्माण झाला असेल तर राहुल यांनी अाधी देशाचे संपूर्ण राजकारण, इतिहास पाहिला पाहिजे. देशाचा पंतप्रधान पत्रकं, नाेट घेऊन जर भाषणं करायला लागला तर मला माझाच मुलगा बरा वाटेल जाे निदान काेणतीही काॅपी हातात न घेता त्याच्या शाळेमध्ये शंभर एक मुलांसमाेर लाेकमान्य टिळकांचे प्रसिद्ध वाक्य बाेलून दाखवत असेल. निदान घाेकंपट्टी का असेना पण त्याने काॅपी हातात न घेता अाणि नाेटबुक हातात न ठेवता छाती ठाेकून दिलेले पाठांतर जसेच्या तसे म्हटल्याने मी मात्र सुखावलाेय.... प्रश्न अजुनही अनुत्तरीयच अाहे ४५ वर्षांचे राहुल माेठे कधी हाेणार?

Sunday, August 9, 2015

सलाम अमरावती....

अाज दाेन वर्षांपूर्वीचं सारं काही जसंच्या तसं अाठवतंय... अामची लगबग चालली हाेती. अमरावतीचा दिव्य मराठीचा पहिला अंक प्रकाशित हाेणार हाेता... नवीन टीम, नव्या दमाची माणसं.. नवी उत्साह... सारं काही नवं नवं वाटत हाेतं... साऱ्यांनाच हे नाविण्य जाणवत हाेतं.

इतर काही दैनिकांप्रमाणे नुसती अालेली बातमी पुढे पानावर उपसंपादकाने ढकलावी अाणि दुसऱ्या दिवशीच्या अंकाचं स्वत:च काैतुक करावं असं काही ‘दिव्य मराठी’त नाही. प्रत्येक बातमीला पॅरामिटर्स लागलेले. दुसऱ्या दिवशी नाेटीस येण्याची वाटच कशाला पहायची? बातमीत दाेन्ही बाजू महत्त्वाच्या अाहेत. वाचकांना अापण  काय देताे नेमके वाचायला?, नाविण्य नसेल तर ती ‘दिव्य मराठी’ची बातमी म्हणून का लावायची या साऱ्यांची विदर्भातील पत्रकांना सवय नव्हती. त्यामुळे दाेन वर्षांपूर्वी १० अाॅगस्टला अामची वेगळीच घाई चालेली हाेती. काेण कुणाला बातमीत काय मागतंय, चीफ सब, उपसंपादक कावरे-बावरे हाेऊन सारं पहाताहेत. रिपाेर्टर्स अापल्या बातमीत अाणखी काय हवे याची विचारणा वरिष्ठांकडे करताहेत.

असं काहीसं वातावरण हाेतं... या ताण-तणावात प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर सृजनाचा अानंद मात्र दिसून येत हाेता.रात्रीचा १२ चा ठाेका पडला अाणि साऱ्यांनी एेकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. अकाेला, अाैरंगाबाद, भाेपाळ कुठून-कुठून फाेन सुरु झाले. साऱ्यांच्याच चेहऱ्यावर अानंद. कुठलाही थकवा नाही वा काेणताही ताण नाही. हाेता फक्त अानंद. नवीन काही झाले अाणि अापण त्याचे साक्षीदार झालाेत याचा.  

प्रत्येक पावलावर पाणी अाणि भाषा बदलते त्याच प्रमाणे प्रत्येक दिवस हा सारखा नसताे. मागील दाेन वर्षात ‘दिव्य मराठी’च्या अमरावती टीमने अनेक चढ-उतार पाहिलेत. अनेक कटू-गाेड प्रसंगांना ताेंड देत ‘दिव्य मराठी’ अाजही ठामपणे उभे अाहे. प्रत्येकाच्या मनात  संस्थेबद्दल पहिल्या दिवशी जितका अादर हाेता तितकाच किंवा त्याहीपेक्षा अधिक अादर संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बळावलेला दिसताेय.

अाजही जणू दरराेजच अापला वर्धापन दिवस अाहे या अर्विभावात टीम अमरावती काम करतेंय. कुठलीही तक्रार नाही. हा जाहीरातचा, ताे वितरणचा असा भेदभाव नाही किंवा कसलेही उणे-धुणे नाही. टीम अमरावती एकत्र बांधली गेलीय ती समविचारांनी, ‘दिव्य मराठी’ला एकसंध ठेवण्यात येथील माणसांचा माेठा हात अाहे. प्रत्येकाचाच अादर, प्रत्येकालाच तेवढा मान, प्रत्येकाचेच म्हणणे गंभीरपणे एेकूण घेण्याची प्रत्येकामध्येच असलेली उपजत सवय.. या साऱ्यांचा हा परिपाक म्हणावा लागेल.

अाज दाेन वर्षांनंतर जराशी अामची गडबड कमी झाली असेल पण उमेद अाणि अाशा अाहेत तशाच कायम अाहेत. ११ तारखेला ‘दिव्य मराठी’ अमरावतीचा दुसरा वर्धापन दिन अाहे. अाज १० तारीख. अामची लगबग पुन्हा सुरू झाली अाहे. उद्या नवीन काय... याची चर्चा झाली.... सारेच पुन्हा एकदा कामाला लागलेत. वाफाळलेल्या चहाच्या कपासाेबतच बैठकीत जुन्या अाठवणींवर चर्चा झाली. टिंगळ-टवाळी झाली. हसू झाले. अाठवणींमुळे असूही अाले; पण माझी टीम खंबीर अाहे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला ताेंड देण्यासाठी........... माझ्या टीमचा प्रत्येक सदस्य ‘बाहुबली’ अाहे. थॅक्यू अमरावती. खूप काही शिकवलंस मला. ज्या वैदर्भीय लाेकांच्या नावे खडे फाेडले जातात. त्याच विदर्भात ‘छातीला माती’ लावून जिवाला जीव देणारी माणसं भेटलीत मला. थॅंक्यू अमरावतीकर.....


Thursday, August 6, 2015

पाकची बत्ती ‘गुल’, चीनच्याही मुसक्या अावळू

उधमपुरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला जेरबंद केल्याने पाकिस्तान अधिकच चवताळला अाहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी हुकूमशहा जनरल (रिटायर्ड) परवेझ मुशर्रफ यांनी भारता प्रकरणी बेताल वक्तव्य केले हाेते. ‘पाकिस्ताने अण्वस्त्र ही शब्बे-बारातसाठी बनवलेली नाहीत, पाकिस्तानी सैनिकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत’ अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य हाेते. मुळात दाेनवेळा युद्धात लाजीरवाना पराभव झाल्यावही पाकिस्तानी नागरिकांमध्ये भारताची कुरापत काढण्याचा किडा वळवळताे याचेच अाश्चर्य वाटते.

अाता उधमपूरमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या अावळल्यानंतर अाता पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख व लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) हमीद गुल यांनी स्वत:च्या अकलेचे दिवाळे ताेडणारे व्टिट‌् केले अाहे. ‘भारताच्या दाेन राजधान्यांचे हिराेशिमा-नागासाकी’ करू असे त्यांचे ते वक्तव्य हाेते.

मुळात गुल यांचे व्यक्तीमत्त्व हे वादग्रस्त राहिलेले अाहे. त्यातही पाकिस्तानी दहशतवाद्याने अापण पाकिस्तानी नागरिक असल्याचे कबुल केल्यानंतरही त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करक पाकिस्तानी लष्करी अधिकारीही जिहादीच असल्याचे स्पष्ट केले अाहे. अापली नेहमीची वापरातली म्हण वापरायचे म्हटले तर या ‘चाेराच्या उलट्या बाेंबा अाहेत.’

असाे पाकिस्तान मागील काही दिवासांपासून अस्वस्थ अाहे ताे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यामुळे. माेदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लगेचच शेजारील राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सुरू केला. यात त्यांना म्यांमार, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांनी चांगला प्रतिसादही दिला. म्यांमारने तर चक्क त्यांच्या देशातील दहशतवादी तळं नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराला देशात कारवाईची परवानगी दिल्याने पाकिस्तान अधिक खवळला अाहे.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे अाणि तेही निवृत्त अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांची अस्वस्थता स्पष्ट करणारे अाहे. भारतीय लष्कराच्या मनात जितकां माेदींप्रती अादर अाहे. त्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांमधील अात्मविश्वास वाढला अाहे तितकीच पाकिस्तानी लष्कराने माेदींची धास्ती घेतली अाहे.

भारतीय लष्करातील जवान गमतीत म्हणतात, ‘साेजा पाकिस्तानी वरना माेदीजी काे बुलाऊंगा’, तेव्हा गुल यांचे वक्तव्य त्या दृष्टीने फारसे गांभीर्याने घेण्यासारखे नसलेे तरी त्याचा वेगळा अर्थ निश्चितच निघू शकताे. भारतामध्ये दहशतवादी हल्ला केलेल्या दहशतवाद्याला पकडल्यानंतर गुल यांनी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केल्यानंतर पाक लष्कराकडून त्यांची चांगलीच खरडपट्टी झाल्याचे समजते. यानंतरच पाक साेबत हमीद यांचीही बत्ती ‘गुल’ झाली अाणि त्यांनी ते वादग्रस्त वक्तव्य डिलीट केले.

चीन वगळता पाकिस्तान अाता एकाकी पडला अाहे. कधीकाळी चीनने भारताशेजारील राष्ट्रांना अापल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत पाकिस्तानातही अापल्या लष्करामार्फत पाक लष्कराला मदत केली अाहे. अजुनही हे कार्य सुरू अाहे. मात्र, अाता चीननेही पाकवरील अापले लक्ष कमी केले अाहे. 

यासाऱ्याचा परिपाक म्हणजे पाकची अस्वस्था वाढत अाहे. एकीकडे अायएसअायएसचा धाेका, दुसरीकडे देशात वाढता दहशतवाद त्यातच भारताचे अाशियासह इतर खंडांमध्येही वाढते प्रस्थ पाकिस्तानला बेचैन करत अाहे.

अायएसअायएसला राेखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज अाहे. अमेरिका, रशियाची मदत घेत भारताने याचा गुप्त प्लान तयार केला अाहे. गरज पडलीच तर पाकच्याही मुसक्या अावळायला अमेरिका मागे-पुढे पाहणार नाही. अाश्चर्याची बाब म्हणजे भारताच्या मदतीला जी दाेन राष्टे सरसावलीत त्या दाेघांमध्येही ३६ चा अाकडा अाहे. परंतु, भारत अमेरिका व रशिया या दाेन राष्ट्रांमध्ये समेट घडवून चीनला शह देण्याची नवी चाल खेळताेय..... हा प्रयत्न यशस्वी झाला तर पाकिस्तानच काय तर चीनच्याही मुसक्या अावळायला अापण सज्ज असू.

Wednesday, August 5, 2015

अाधी कसाब अाता कासीम


मुंबईवर झालेल्या दहशवादी हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब याचे नाव देशात जवळपास साऱ्यांनाच ठाऊक अाहे. भारताचे एखादे माजी राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे नाव विचारल्यावर अनेकांना अाधी डाेके खाजवावे लागते मग उत्तर सुचते. कसाबच्या बाबतीत मात्र असे नव्हते. कसाब कसा अाहे, ताे रागीट अाहे का शांत, त्याला बिर्याणी किती अावडते, त्याला कायद्याचेही ज्ञान अाहे याच्या बातम्या वाचून-वाचून अापल्याला संपूर्ण कसाब पाठ झाला हाेता. अाज पुन्हा एक दहशतवादी जम्मू-काश्मीरात पकडला गेलाय. म्हणूनच कदाचित कसाबची अाठवण निघाली.

बघा किती दुर्देव अाहे. ज्याने शेकडाेंना निर्दयीपणे मारले त्या कसाबचीही अापल्याला अाठवण येते. असाे. कसाब पुन्हा स्मरणात येण्याचे कारण म्हणजे अाज पकडला गेलेला दहशतवादी. त्याचे नाव उस्मान कासीम अाहे. पाकिस्तानातील फैजाबादचा ताे रहिवासी अाहे. कसाब प्रमाणेच ताे किती निढार्वलेला अाहे हे त्याला पकडल्यानंतर लगेचच दिसून अाले. अापण एका शत्रू राष्ट्राच्या सुरक्षा दलाच्या हातात सापडलाे अाहाेत याचे त्याला साेयरे-सुतकही वाटत नव्हते. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्याशी सुरुवातीला संवाद साधला तेव्हा चक्क ताे हसत हाेता.

त्याचे हासूही किती निष्ठूरपणाचे हाेते हे विविध चॅनल्सवाल्यांनी दाखवलेल्या एक्ल्युजीव्ह वरून स्पष्ट हाेतेच. कासीम तसा विशीतलाच वाटताे. अगदी सहजपणे ताे सारे सांगत हाेता. ‘मै पाकिस्तानके फैजाबाद का हूं, मेरा नाम उस्मान कासीम है, हम दाे लाेग थे, एक मारा गया’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हालत नव्हती.

अत्यंत संयमाने अाणि चालाखीने ताे हे सगळं सांगत हाेता. अाता पुन्हा एक नवा अध्याय सुरू हाेणार. अापण देशाला कसाबची, अफजल गुरुची, याकुबची अाेळख करून दिली. यांच्याच पंक्तीत अाणखी बिर्याणी हासडण्यासाठी अाणखी एक पाकिस्तानी दहशतवादी अापल्याला मिळाला अाहे. अाता ताे काय काय बरळताे अाणि माध्यमं पुन्हा त्याला कशी प्रसिद्धी देताे याच्यावरच त्याची महानता अवलंबून असेल. अातापासून त्याच्या विषयीची चर्चा सुरू हाेईल. ताे किती चांगला अाहे याचे अापल्याच देशातील काही जण दाखले देतील. एखादा बाॅलीवुड स्टार अापल्यालाच मानवतेचे धडे देत त्याला माफ करण्याचा सल्ला अापल्या सरकारला देईल. एखादा नेता त्याला ताे विशिष्ट धर्माचा असल्याने त्याच्यावर भारतात अन्याय हाेत असल्याची गरळ अाेकेल. भारतात प्रत्येकालाच भाषण स्वातंत्र्य असल्याचे सांगत अनेक तत्त्वज्ञानी त्याचे समर्थन करतील. युनाेमध्ये काेण कुठल्या या कासिमच्या नावाची चर्चा हाेईल. पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला हाेईल अाणि कसाब, कासीम नंतर अाणखी एक ‘क’ दहशतवादी भारतात पाेसला जाईल. चालूद्या जय हाे...... भारतीय लाेकशाहीला दंडवत...

Tuesday, August 4, 2015

इतिहासाची पुनरावृत्ती; विराेध नेमका कशाचा

संसदेमध्ये पुन्हा एकदा वादंग माजला अाहे. विराेधकांच्या गाेंधळाने त्रासलेल्या लाेकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चक्क २५ काॅंग्रेस खासदारांना निलंबित केले. यानंतरही या गाेंधळी खासदारांनी अापले बेताल वागणे सुरूच ठेवले अाहे. तसं पहायला गेलं तर काॅंग्रेसला देशाच्या विराेधी बाकांवर बसण्याची कमीच संधी मिळाली अाहे. जेंव्हा असा प्रसंग अाला तेंव्हा-तेंव्हा ताे कालावधीही फारसा माेठा नव्हता.

अाज जे सत्ताधारी अाहेत ते मागील जवळपास ४० ते ५० वर्षांपासून सातत्याने विराेधी बाकांवरच बसत अालेले अाहेत. कधीकाळी त्यांनीही अशाच प्रकारचा गाेंधळ संसदेत घातला अाहे. संसदेच्या इतिहासात केवळ दाेनदाच इतक्या माेठ्या प्रमाणावर खासदारांच्या निलंबनाचा प्रसंग अाला अाहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काॅंग्रेस सरकारने ठक्कर समिती गठीत केली हाेती. इंदिरा गांधी यांच्या हत्येबाबतचा तपास करण्याची तसेच हत्येची खरी कारणे शाेधण्याची जबाबदारी या समितीवर हाेती.

समितीने जबाबदारी पार पाडली परंतु काही केल्या केंद्र सरकार अहवाल संसदेत अाणण्यास तयार नव्हते. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विराेधकांची धार बाेथट करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश काही अाले नाही. संसदेत गाेंधळ इतका वाढला की संसदीय कार्यमंत्री असलेल्या एचकेएल भगत यांनी चक्क ६८ खासदारांना निलंबित केले.

भगत हे काॅंग्रेसचे अत्यंत निष्ठावान मानले जात. १९८९ चा हा प्रंसंग. विराेधी पक्षाची इतकीच मागणी हाेती की ठक्कर कमिशनने दिलेला अहवाल सार्वजनिक करत ताे संसदेत सादर करण्यात यावा. असे केल्याने सरकार अडचणीत अाले असते. कारण या अहवालात इंदिराजींच्या हत्येचे अाराेपी म्हणून ज्यांचे नाव घेण्यात अाले हाेते त्यामध्ये गांधी कुटुंबियांच्या जवळच्या एका व्यक्तीचे नाव हाेते. असाे दुसरा असा प्रसंग २०१३ मध्ये वेगळ्या तेलंगानाच्या मुद्यावरून अाेढावला हाेता. यानंतर प्रथमच एकाच पक्षाचे २५ खासदार निलंबित करण्यात अाले. इतिहासाची पुनरावृत्ती हाेत नसल्याचे सांगणाऱ्यांसाठी हे चांगले उदाहरण अाहे.

मागील कैक वर्ष सत्ता उपभाेगल्यानंतर अन‌् देशाची पुरती वाट लावल्यानंतर अाज सत्ताधारी विराेधी बाकावर अाहेत. अन‌् सरकारवर ताशेरे अाेढण्यात ज्यांच्या दाेन पिढ्या गेल्या त्या विराेधीपक्षातील नेत्यांचे मुलं, नातू सत्ताधारी म्हणून विराजमान अाहेत. एेरवी टाॅस करताना हेड पडायचे अाता काय ते पहिल्यांदाच टेल पडले अन‌् अवचित घडले. काॅंग्रेसने केलेला विराेध पाहता केवळ काॅंग्रेस सत्ताधारी असताना २ जी प्रकरण, कलमाडी प्रकरण अाणि अशाच कैक प्रकरणात तब्बल महिनाभर विराेधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले नव्हते. अाता हाच बदला जणू काॅंग्रेस घेत अाहे असे दिसते. यात माेठे नुकसान हाेतेय ते देशाचे. ज्यांनी खासदार म्हणून तुम्हाला निवडणून दिले त्या सामान्य जनतेच.

संसदेतला गाेंधळ पाहिला तरी मला माझ्या मुलाच्या ज्युनियर केजी वर्गातील त्याचे मित्र बरे वाटतात. तेही गाेंधळ घालतात. मॅडम त्यांनाही रागावतात. या छाेट्यांमधला निरागसपणा कधी समजूतदारपणात बदलताे तेच कळत नाही. देव कराे अन‌् स्वत:ला खासदार म्हणवणाऱ्या या बुजगावण्यांना थाेडी का हाेहीना अक्कल येवाे.....

Sunday, August 2, 2015

माध्यमं बदलताहेत की अापण

मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये हाेत असलेला बदल विलक्षण मनाला सलताे अाहे. नकाे त्या गाेष्टींचं उद्दात्तीकरण करणे, नकाे त्या गाेष्टींकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणे या साऱ्यांनी मन अस्वस्थ हाेतेय. चार-चाैघात जरी काेणी माध्यमांविषयी बाेललं तरी पूर्वी अंगातलं रक्त सळसळायचं... माध्यमांनी केलेले सकारात्मक बदल, माध्यमांनी केलेल्या क्रांत्या या साऱ्यांची उजळणी संबंधितांच्या कानावर अादळेपर्यंत अाणि त्याने त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागेपर्यंत मन शांत व्हायचे नाही. अाता हल्ली असं माध्यमांविषयी कुणी अाराेप केले, नुसतं बाेललं तरी मान शरमेने खाली घालावी का असा प्रश्न पडताे. कारण चुकतंय काेण हे खरंच अापल्याला माहित असतं....
माध्यमं देशाचा चवथा अाधार स्तंभ वगैरे मानली जातात हे अापण सातत्याने एेकत अालाेय. एखाद्या वक्त्याला नुसतं एखाद्या कार्यक्रमात बाेलवलं तरी त्याच्या भाषणात ही अाेळ अालीच पाहिजे. पण अाता देश पाेखरायला ही चवथी माध्यमं कारणीभूत असल्याचं जाणवतंय... ज्या पद्धतीने याकुबच्या फाशीचं लाईव्ह कव्हरेज दाखवत अनेकांनी स्वत:चीच पाठ थाेपटून घेतली ते पाहिलं अाणि टीव्हीवर तरी मी बातम्या पाहणं साेडून दिलंय... मुलाला रिमाेट अाणि टीव्ही कळायला लागल्यापासून क्वचितच घरी बातम्यांचे चॅनल्स लावायचाे. माध्यमांमध्ये झालेल्या विदारक बदलानं अाता छाेटाभिम किंवा काटूर्न नेटवर्कच बरं वाटताहेत. त्यातही स्वप्न दाखवलं जातात कधी-कधी अतिरंजीतपणा असताे मात्र अवास्तव अाणि लाेकांवर विचार लादण्याचा प्रयत्न तर केलेला नसताे......
माध्यमं बदलताहेत असं म्हटलं तर मीडीयामध्ये लगेचच अारडा-अाेरड सुरू हाेते. लाेकांना जे अावडतं ते अाम्ही दाखवताे. पण लाेगांची टेस्ट ठरवताे काेण. लाेकांना सवय लावतं काेण? लाईव्ह कव्हरेजच्या नादात हे सारं हाेतंय असं म्हणूयात अापण पण चक्क काही दैनिकांच्या संपादकीयलाही उतरती कळा लागली अाहे. मराठा, वंदे मातरम‌् या सारख्या दैनिकांनी लाेकांमध्ये नवचेतना निर्माण करत त्यांना क्रांतीची दिशा दिली. हल्लीची काही दैनिकांची संपादकीय वाचली की वैचारिक दिवाळखाेरी किती वाढलीय अन‌् काही जणांच्या विचारांनाही कसा लकवा मारलेला अाहे हे जात्ततेय. असाे... माध्यमांना मृत्यू नाही ती अजरामर अाहेत असं म्हणतात... पण येणाऱ्या काळात जनक्षाेभ इतका वाढेल की माध्यमांविराेधात अापल्या देशात क्रांती झाल्यास काही वावगं वाटायला नकाे.

Thursday, January 15, 2015

दहशत, ‘वाद’ अाणि अापण

एका संकेतस्थळावरील बातम्यांना अाज सहज भेट दिली. काही नवीन अपडेट अाहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक दिवशी निघणारा वर्तमानपत्राचा अंक, चॅनल्सचे सादरीकरण त्यात त्या बातम्या देते अाणि अापणही नित्य नियमाने त्यात त्या बातम्या वाचताे, एेकताे. बदल कुठेच दिसत नाही. दहशतवाद, बलात्कार, चाेरी, शेतकऱ्यांच्या अात्महत्या, अांतरराष्ट्रीय म्हणाल तर अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड अाफ्रिकी देशात दहशतवादी हल्ले, गाेळीबार, माथेफेरुचे थैमान.... समाज प्रगतिशील हाेताेय असे एका बाजूला अापण म्हणताे, मात्र, दुसरीकडे समाजाची अधाेगती सुरू असल्याचे दिसून येतेय. समाजात कमालीचे नैराश्य वाढलेय. प्रत्येकजण तळ हातावरील अापली अायुष्यरेषा लवकरात लवकर कशी धुसर करता येईल या प्रयत्नात दिसताेय.
कामाच्या व्यापामुळे माझ्या प्रमाणेच अनेकांचे वाचन अाणि लिखाणही कमी झालेय.. सभा, संमेलने, मेळाव्यात साहित्यिक मंडळी माेठ्या ताेऱ्यात वाचनाची अावड लावा, चांगल्या सवयी जाेपासाचे फुकटचे सल्ले मुलांच्या गळी उतरवू पाहताहेत पण मागील कित्येक महिन्यात एखादे चांगले पुस्तक या साहित्यिकांना लिहता अाले नाही. समाजाच्या व्यथा मांडण्यापेक्षा त्यांना सकारात्मक मार्ग दाखवणाऱ्या चार अाेळी कविताही ते लिहू शकले नाहीत ही वस्तूस्थीती अाहे.
छाेटा-माेठ्या गाेष्टींवरून ‘अ’ वरून सुरू झालेला वाद कधी तुझ्या XXXXX पर्यंत पाेहंचला हेच एकमेकांना कळेनासे झालेय. प्रत्येकजण अापल्याच व्यापात गुंतला अाहे. अाजचा दिवस कधी मावळताे हे लवकर कळावे यासाठी हल्ली अाॅफीसच्या पूर्वेच्याएेवजी पश्चिमेलाच स्लाइड विंडाे लावल्या जाताहेत. सारं काही अस्वस्थ करणारं अाहे. दहशत, ‘वाद’ अाणि अापल्यातच गुंतत चाललेलाे ‘अापण’ सारखं....
 पुनरागमनायच...
मागील तीन ते चार वर्षांपासून ब्लाॅग विश्वासी संपर्क तुटला हाेता. मुक्त लिखाण करण्यासाठी यासारखे दुसरे माध्यम नाही याची उपरती झाल्याने पुन्हा अाज मनात विचार अाला. श्रीगणेशा केव्हाच केला हाेता अाता ठरवलं निदान काहीतरी पुन्हा लिहायचं... जसं जमेल तसं... वेळ असले तरी अाणि नसेल तरी.... पाणी वाहतं राहणं अधिक चांगलं अाहे. ते संचलं की त्याचे डबके बनायला वेळ लागत नाही.