अाज दाेन वर्षांपूर्वीचं सारं काही जसंच्या तसं अाठवतंय... अामची लगबग चालली हाेती. अमरावतीचा दिव्य मराठीचा पहिला अंक प्रकाशित हाेणार हाेता... नवीन टीम, नव्या दमाची माणसं.. नवी उत्साह... सारं काही नवं नवं वाटत हाेतं... साऱ्यांनाच हे नाविण्य जाणवत हाेतं.
इतर काही दैनिकांप्रमाणे नुसती अालेली बातमी पुढे पानावर उपसंपादकाने ढकलावी अाणि दुसऱ्या दिवशीच्या अंकाचं स्वत:च काैतुक करावं असं काही ‘दिव्य मराठी’त नाही. प्रत्येक बातमीला पॅरामिटर्स लागलेले. दुसऱ्या दिवशी नाेटीस येण्याची वाटच कशाला पहायची? बातमीत दाेन्ही बाजू महत्त्वाच्या अाहेत. वाचकांना अापण काय देताे नेमके वाचायला?, नाविण्य नसेल तर ती ‘दिव्य मराठी’ची बातमी म्हणून का लावायची या साऱ्यांची विदर्भातील पत्रकांना सवय नव्हती. त्यामुळे दाेन वर्षांपूर्वी १० अाॅगस्टला अामची वेगळीच घाई चालेली हाेती. काेण कुणाला बातमीत काय मागतंय, चीफ सब, उपसंपादक कावरे-बावरे हाेऊन सारं पहाताहेत. रिपाेर्टर्स अापल्या बातमीत अाणखी काय हवे याची विचारणा वरिष्ठांकडे करताहेत.
असं काहीसं वातावरण हाेतं... या ताण-तणावात प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर सृजनाचा अानंद मात्र दिसून येत हाेता.रात्रीचा १२ चा ठाेका पडला अाणि साऱ्यांनी एेकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. अकाेला, अाैरंगाबाद, भाेपाळ कुठून-कुठून फाेन सुरु झाले. साऱ्यांच्याच चेहऱ्यावर अानंद. कुठलाही थकवा नाही वा काेणताही ताण नाही. हाेता फक्त अानंद. नवीन काही झाले अाणि अापण त्याचे साक्षीदार झालाेत याचा.
प्रत्येक पावलावर पाणी अाणि भाषा बदलते त्याच प्रमाणे प्रत्येक दिवस हा सारखा नसताे. मागील दाेन वर्षात ‘दिव्य मराठी’च्या अमरावती टीमने अनेक चढ-उतार पाहिलेत. अनेक कटू-गाेड प्रसंगांना ताेंड देत ‘दिव्य मराठी’ अाजही ठामपणे उभे अाहे. प्रत्येकाच्या मनात संस्थेबद्दल पहिल्या दिवशी जितका अादर हाेता तितकाच किंवा त्याहीपेक्षा अधिक अादर संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बळावलेला दिसताेय.
अाजही जणू दरराेजच अापला वर्धापन दिवस अाहे या अर्विभावात टीम अमरावती काम करतेंय. कुठलीही तक्रार नाही. हा जाहीरातचा, ताे वितरणचा असा भेदभाव नाही किंवा कसलेही उणे-धुणे नाही. टीम अमरावती एकत्र बांधली गेलीय ती समविचारांनी, ‘दिव्य मराठी’ला एकसंध ठेवण्यात येथील माणसांचा माेठा हात अाहे. प्रत्येकाचाच अादर, प्रत्येकालाच तेवढा मान, प्रत्येकाचेच म्हणणे गंभीरपणे एेकूण घेण्याची प्रत्येकामध्येच असलेली उपजत सवय.. या साऱ्यांचा हा परिपाक म्हणावा लागेल.
अाज दाेन वर्षांनंतर जराशी अामची गडबड कमी झाली असेल पण उमेद अाणि अाशा अाहेत तशाच कायम अाहेत. ११ तारखेला ‘दिव्य मराठी’ अमरावतीचा दुसरा वर्धापन दिन अाहे. अाज १० तारीख. अामची लगबग पुन्हा सुरू झाली अाहे. उद्या नवीन काय... याची चर्चा झाली.... सारेच पुन्हा एकदा कामाला लागलेत. वाफाळलेल्या चहाच्या कपासाेबतच बैठकीत जुन्या अाठवणींवर चर्चा झाली. टिंगळ-टवाळी झाली. हसू झाले. अाठवणींमुळे असूही अाले; पण माझी टीम खंबीर अाहे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला ताेंड देण्यासाठी........... माझ्या टीमचा प्रत्येक सदस्य ‘बाहुबली’ अाहे. थॅक्यू अमरावती. खूप काही शिकवलंस मला. ज्या वैदर्भीय लाेकांच्या नावे खडे फाेडले जातात. त्याच विदर्भात ‘छातीला माती’ लावून जिवाला जीव देणारी माणसं भेटलीत मला. थॅंक्यू अमरावतीकर.....

No comments:
Post a Comment