संसदेमध्ये पुन्हा एकदा वादंग माजला अाहे. विराेधकांच्या गाेंधळाने त्रासलेल्या लाेकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चक्क २५ काॅंग्रेस खासदारांना निलंबित केले. यानंतरही या गाेंधळी खासदारांनी अापले बेताल वागणे सुरूच ठेवले अाहे. तसं पहायला गेलं तर काॅंग्रेसला देशाच्या विराेधी बाकांवर बसण्याची कमीच संधी मिळाली अाहे. जेंव्हा असा प्रसंग अाला तेंव्हा-तेंव्हा ताे कालावधीही फारसा माेठा नव्हता.
अाज जे सत्ताधारी अाहेत ते मागील जवळपास ४० ते ५० वर्षांपासून सातत्याने विराेधी बाकांवरच बसत अालेले अाहेत. कधीकाळी त्यांनीही अशाच प्रकारचा गाेंधळ संसदेत घातला अाहे. संसदेच्या इतिहासात केवळ दाेनदाच इतक्या माेठ्या प्रमाणावर खासदारांच्या निलंबनाचा प्रसंग अाला अाहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काॅंग्रेस सरकारने ठक्कर समिती गठीत केली हाेती. इंदिरा गांधी यांच्या हत्येबाबतचा तपास करण्याची तसेच हत्येची खरी कारणे शाेधण्याची जबाबदारी या समितीवर हाेती.
समितीने जबाबदारी पार पाडली परंतु काही केल्या केंद्र सरकार अहवाल संसदेत अाणण्यास तयार नव्हते. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विराेधकांची धार बाेथट करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश काही अाले नाही. संसदेत गाेंधळ इतका वाढला की संसदीय कार्यमंत्री असलेल्या एचकेएल भगत यांनी चक्क ६८ खासदारांना निलंबित केले.
भगत हे काॅंग्रेसचे अत्यंत निष्ठावान मानले जात. १९८९ चा हा प्रंसंग. विराेधी पक्षाची इतकीच मागणी हाेती की ठक्कर कमिशनने दिलेला अहवाल सार्वजनिक करत ताे संसदेत सादर करण्यात यावा. असे केल्याने सरकार अडचणीत अाले असते. कारण या अहवालात इंदिराजींच्या हत्येचे अाराेपी म्हणून ज्यांचे नाव घेण्यात अाले हाेते त्यामध्ये गांधी कुटुंबियांच्या जवळच्या एका व्यक्तीचे नाव हाेते. असाे दुसरा असा प्रसंग २०१३ मध्ये वेगळ्या तेलंगानाच्या मुद्यावरून अाेढावला हाेता. यानंतर प्रथमच एकाच पक्षाचे २५ खासदार निलंबित करण्यात अाले. इतिहासाची पुनरावृत्ती हाेत नसल्याचे सांगणाऱ्यांसाठी हे चांगले उदाहरण अाहे.
मागील कैक वर्ष सत्ता उपभाेगल्यानंतर अन् देशाची पुरती वाट लावल्यानंतर अाज सत्ताधारी विराेधी बाकावर अाहेत. अन् सरकारवर ताशेरे अाेढण्यात ज्यांच्या दाेन पिढ्या गेल्या त्या विराेधीपक्षातील नेत्यांचे मुलं, नातू सत्ताधारी म्हणून विराजमान अाहेत. एेरवी टाॅस करताना हेड पडायचे अाता काय ते पहिल्यांदाच टेल पडले अन् अवचित घडले. काॅंग्रेसने केलेला विराेध पाहता केवळ काॅंग्रेस सत्ताधारी असताना २ जी प्रकरण, कलमाडी प्रकरण अाणि अशाच कैक प्रकरणात तब्बल महिनाभर विराेधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले नव्हते. अाता हाच बदला जणू काॅंग्रेस घेत अाहे असे दिसते. यात माेठे नुकसान हाेतेय ते देशाचे. ज्यांनी खासदार म्हणून तुम्हाला निवडणून दिले त्या सामान्य जनतेच.
संसदेतला गाेंधळ पाहिला तरी मला माझ्या मुलाच्या ज्युनियर केजी वर्गातील त्याचे मित्र बरे वाटतात. तेही गाेंधळ घालतात. मॅडम त्यांनाही रागावतात. या छाेट्यांमधला निरागसपणा कधी समजूतदारपणात बदलताे तेच कळत नाही. देव कराे अन् स्वत:ला खासदार म्हणवणाऱ्या या बुजगावण्यांना थाेडी का हाेहीना अक्कल येवाे.....

No comments:
Post a Comment