माध्यमं बदलताहेत की अापण
मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये हाेत असलेला बदल विलक्षण मनाला सलताे अाहे. नकाे त्या गाेष्टींचं उद्दात्तीकरण करणे, नकाे त्या गाेष्टींकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणे या साऱ्यांनी मन अस्वस्थ हाेतेय. चार-चाैघात जरी काेणी माध्यमांविषयी बाेललं तरी पूर्वी अंगातलं रक्त सळसळायचं... माध्यमांनी केलेले सकारात्मक बदल, माध्यमांनी केलेल्या क्रांत्या या साऱ्यांची उजळणी संबंधितांच्या कानावर अादळेपर्यंत अाणि त्याने त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागेपर्यंत मन शांत व्हायचे नाही. अाता हल्ली असं माध्यमांविषयी कुणी अाराेप केले, नुसतं बाेललं तरी मान शरमेने खाली घालावी का असा प्रश्न पडताे. कारण चुकतंय काेण हे खरंच अापल्याला माहित असतं....
माध्यमं देशाचा चवथा अाधार स्तंभ वगैरे मानली जातात हे अापण सातत्याने एेकत अालाेय. एखाद्या वक्त्याला नुसतं एखाद्या कार्यक्रमात बाेलवलं तरी त्याच्या भाषणात ही अाेळ अालीच पाहिजे. पण अाता देश पाेखरायला ही चवथी माध्यमं कारणीभूत असल्याचं जाणवतंय... ज्या पद्धतीने याकुबच्या फाशीचं लाईव्ह कव्हरेज दाखवत अनेकांनी स्वत:चीच पाठ थाेपटून घेतली ते पाहिलं अाणि टीव्हीवर तरी मी बातम्या पाहणं साेडून दिलंय... मुलाला रिमाेट अाणि टीव्ही कळायला लागल्यापासून क्वचितच घरी बातम्यांचे चॅनल्स लावायचाे. माध्यमांमध्ये झालेल्या विदारक बदलानं अाता छाेटाभिम किंवा काटूर्न नेटवर्कच बरं वाटताहेत. त्यातही स्वप्न दाखवलं जातात कधी-कधी अतिरंजीतपणा असताे मात्र अवास्तव अाणि लाेकांवर विचार लादण्याचा प्रयत्न तर केलेला नसताे......
माध्यमं बदलताहेत असं म्हटलं तर मीडीयामध्ये लगेचच अारडा-अाेरड सुरू हाेते. लाेकांना जे अावडतं ते अाम्ही दाखवताे. पण लाेगांची टेस्ट ठरवताे काेण. लाेकांना सवय लावतं काेण? लाईव्ह कव्हरेजच्या नादात हे सारं हाेतंय असं म्हणूयात अापण पण चक्क काही दैनिकांच्या संपादकीयलाही उतरती कळा लागली अाहे. मराठा, वंदे मातरम् या सारख्या दैनिकांनी लाेकांमध्ये नवचेतना निर्माण करत त्यांना क्रांतीची दिशा दिली. हल्लीची काही दैनिकांची संपादकीय वाचली की वैचारिक दिवाळखाेरी किती वाढलीय अन् काही जणांच्या विचारांनाही कसा लकवा मारलेला अाहे हे जात्ततेय. असाे... माध्यमांना मृत्यू नाही ती अजरामर अाहेत असं म्हणतात... पण येणाऱ्या काळात जनक्षाेभ इतका वाढेल की माध्यमांविराेधात अापल्या देशात क्रांती झाल्यास काही वावगं वाटायला नकाे.

No comments:
Post a Comment