लाेकसभेत बुधवारी पुन्हा एकदा दुर्गावतार पहावयास मिळाला. प्रचंड
अावेश, कमालीचा संताप, अापली भूमिका मांडण्याची तत्परता अाणि याच्या जाेडीला तितकाच
संयम… हे सारं
काही लाेकसभेत एकाच खासदाराच्या अंगी असणं तसं फारसं क्वचितच दिसतं.
क्रिकेट अाणि फुटबाॅलच्या मैदानावर एखादवेळी कमी गाेंधळ हाेत
असेल तितका किंवा त्यापेक्षाही अधिक गाेंधळ अापल्याला लाेकसभेमध्ये नजरेस पडताे, एेकावयास
मिळताे. फारसा इतिहासात मी जाणार नाही किंवा डाेकावण्याचा माझा मुळीच मानस नाही. परंतु,
विराेधकांची ताेंडं अात्मविश्वासाच्या बळावर कशापद्धतीने बंद करता येतात. अापण काेणतीही
चूक केलेली नाही हे छातीठाेकपणे कसं सांगता येतं, विराेधक सत्तेवर असताना त्यांनी कसं
देशाचं खाेबरं केलं, ते किती दळभद्री सरकार हाेतं हे एका महिला खासदाराने अशा काही पद्धतीने देशापुढे मांडलं की, कदाचित याचा
अंंदाजा त्यांच्या भाषणापूर्वीच अाल्याने विराेधकांनी सभात्याग केला हाेता.
काही वर्षांपूर्वी विराेधी बाकावर बसताना भाजप नेत्या सुषमा स्वराज
या अशा पद्धतीने भाषण करत अाणि त्यांच्या विराेधकांची ताेंडंच गप्प करत. बुधवारी सुषमांच्या
‘स्मृती’ पुन्हा एकदा जाग्या झाल्या. ज्या अावेशात, शुद्ध अाणि श्रवणीय हिंदीत सुषमा
स्वराज लाेकसभेत भाषण करत ताेच अावेश अाणि अापला विषय मांडण्याचे तेच कसब स्मृती इराणी
यांच्या भाषणातून दिसून अाले.
सकाळपासूनच लाेकसभा अाणि राज्यसभेत हैदराबादेतील राेहीत वेमालु
अाणि जेएनयूतील दहशतवादी घाेषणाबाजीवर घमासान सुरू हाेते. गाेंधळ हा लाेकसभेच्या पाचवीलाच
पुजलेला त्यामुळे ताे हाेणे अपेक्षितच हाेत. मात्र, बुधवारी लाेकसभेत या दाेन विषयांवर
जे काही सदस्य बाेलले त्यात काही सदस्यांचे भाषण खरंच अभ्यासपूर्ण वाटले. काॅंग्रेसचे ज्याेतिरादित्य सिंधीया यांनी काॅंग्रेसची
भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांच्या भाषणात किंवा बाजू मांडण्यात
काेणतीही धार दिसून अाली नाही.
यानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाने अनेक
काॅंग्रेस नेत्यांची बाेलती बंद झाल्याचे दिसले.
मध्येच राहुल गांधी उठून जाण्याची वेळ अाणि ठाकूर यांनी अाराेपांच्या फैरी झाडण्यास सुरू केल्याची
वेळ एकच अाल्याने काहीकाळ विराेधकांच्या खेम्यामध्ये शांतता हाेती. ठाकूर यांनी काही
प्रश्न इतके ठासून विचारले की, लाेकसभेच्या कामकाज पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवण्यापुढे
विराेधक त्यांच्या प्रश्नांना ताेंड देऊ शकले नाहीत. इथे ज्येष्ठ अाणि वरिष्ठ काॅंग्रेस
नेत्यांचा हाेमवर्क कमी पडल्याचे दिसले. यानंतर काहीकाळ शांततेत गेला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत
यांना कमी वेळ मिळाल्याने ते फारसे बाेलू शकले नाही, मात्र त्यांनी कमी वेळात प्रभावी
भाषण केल्याचा केलेला प्रयत्न चांगला हाेता.
यानंतर मात्र, मैदान गाजवले ते स्मृती इराणी यांनी. विराेधकांनी
केलेल्या प्रत्येक अाराेपांना त्यांनी पुराव्यासह उत्तर दिले. त्यांचे भाषण इतके प्रभावी
झाले की, विराेध करणे तर साेडाच अाता कदाचित विराेधकांना प्रश्न पडला असेल की त्यांना
गुरुवारी पुन्हा संसदेत काय उत्तर द्यावे.
अाज बऱ्याच दिवसांनंतर लाेकसभेत गाेंधळासह पार पडलेली चर्चा मात्र ‘स्मृती’त
राहणारी अाहे इतके मात्र निश्चित.
(इथे सुषमा यांच्या लाेकसभेतील उपस्थिती अाणि त्यांच्या भाषणांसाठी
त्यांचा उल्लेख त्यांच्या स्मृती असा करण्यात अाला अाहे. मला विश्वास अाहे सुज्ञ वाचक
तसाच अर्थ घेतील. )
No comments:
Post a Comment