ही कथा अात्ता अाठवण्याचे कारण म्हणजे सध्या सेना-भाजपमध्ये सुरु
असलेले वाक्युद्ध. सेना- भाजप युती ही काही अाजची नाही. मात्र, सध्या दाेनही पक्षांमध्ये
सुखाचा संसार साेडून एकमेकांवर मिळेल तिथे चिमटे काढण्याचे प्रकार सुरु अाहेत. तर वरील
गाेष्टीत जसे खेकडा गुणधर्म साेडत नाही तसे राजकारणीही अापला गुणधर्म साेडत नसल्याने
ही कथा इथे नमूद करावी वाटली.
माेदींवरून सुरू झालेले सेना-भाजपचे व्टिट् युद्ध संपत नाही
ताेच अाता मान्सून पूर्व पडलेल्या पावसात भरलेल्या शेततळे तसेच नदी, नाल्यांतील पाण्यावरून
पुन्हा या दाेन पक्षांमध्ये वाक्युद्ध सुरु झाले अाहे.
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्तच्या कामांचे काैतुक करत फाेटाेसह व्टिट
केल्यानंतर अाता सेनेनेही त्याला उत्तर देत परंडा येथील उल्फा नदीला मान्सून पूर्व
पावसाने अालेल्या पूराचे फाेटाे व्टिट्वर टाकलेत. याला शिवजलक्रांती असे नामकरणही
करण्यात अालेय.
मुळात दुष्काळाने हाेरपळून निघालेल्या महाराष्ट्राला विशेषकरून
मराठवाड्यातील शेतकरी या पावसाने सुखावला अाहे. असे असताना समाधान अाणि अानंद व्यक्त
करायचे साेडून राज्यातील दाेनही प्रबल पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत लाेकांचा अानंद कमी
करण्याचा घाट घालत अाहेत.
मुळात राज्यात जलयुक्तची कामंच झालेली नव्हती यामुळे राज्यावर
मागील कैक वर्षांपासून जलसंकट हाेतं. यंदा मुख्यमंत्र्यांनी जातीनं यात लक्ष घालून
ती कामं राज्यात करून घेतली. यात मराठवाड्यावर सरकारचा अधिक फाेकस हाेता. याचा परिणाम
अाता कुठं दिसू लागला असतानाच त्याच्या श्रेयावरून भांडणं कितपत याेग्यय?
यंदा पाऊस सरासरीपेक्षाही जास्त असल्याचे दावे केले जाताहेत.
असे असताना जागाेजाग केलेल्या शेततळे तसेच जलयुक्तच्या कामांमुळे जर देव न कराे अाणि
महापूराचे संकट अाले तर सेना किंवा मुख्यमंत्री घेणार का त्याची जबाबदारी?
No comments:
Post a Comment