माध्यमं लाेकशाहीचे चाैथे अाधारस्तंभ मानले जातात. एखाद्या देशात
नेमके काय घडतेय, ताे देश कसा अाहे? तेथील माणसं कशी अाहेत, संस्कृती काय अाहे हे सारं
काही जाणून घ्यायचे असले की अाधी त्या देशातील वृत्तपत्र तसेच इतर माध्यमांचा अभ्यास
करावा असे बाेलले जाते. माध्यमं ही समाजाचा अारसा असतात. समाजात घडणाऱ्या विविध घटनांना
अगदी तटस्थपणे मांडण्याचे काम माध्यमं अाणि या माध्यमातून पत्रकार करत असतात. एका छाेट्या
घटनेने मात्र मला अत्यंत चिंतेत टाकले अाहे. मी स्वत: मागील एका दशकापासून या माध्यमांचाच एक भाग म्हणून काम करताेय. परंतु,
माझ्या मुलाने विचारलेल्या एका प्रश्नाने मला चांगलेच टेन्शनमध्ये अाणले अाहे.
साेमवारची सकाळ असल्याने सवयीप्रमाणे मी सकाळी उठल्यावर अाधी
बातम्या लावल्या. विविध चॅनल्स बदलल असताना प्रत्येक न्यूज चॅनल्सवर एखादी तरी पाकिस्तानशी
संबंधित बातमी हाेतीच. पम्पाेरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी हे कसे पाक पुरस्कृत
अाहेत, मागील काही दिवसांपासून पाकच्या कारवाया कशा वाढत अाहेत अाणि यात नाहक अापल्या
जवानांना कसे वीर मरण येतेय हीच टेप एका चॅनलवर लागलेली हाेती.
माझा लहान मुलगा अशा बाबतीत अत्यंत संवेदनशील असल्याने अामच्या
घरात माझ्या स्वातंत्र्यावर सध्या गदा अाली अाहे. (हे गमतीत) माझा कल हा अॅक्शनपट तसेच
हाॅरर चित्रपट पहाण्याकडे अाहे. परंतु, माझ्या
मुलाचाही कल तसाच हाेत असल्याने मी मागील कैक महिन्यांपासून असे चित्रपट पहाणे बंद
केले. त्याचमुळे मी अाता न्यूज चॅनल्स पहाण्याकडे कल वाढवला हाेता. माझ्या व्यवसायाशीही
संबंध असल्याने माझे ते कामच अाहे. परंतु, अाता मला तेही बंद करावे लागणार असे दिसतेय.
वर उल्लेख केल्याप्रमाणे मी साेमवारी एक चॅनल पहात असताना माझ्या
चार वर्षाच्या मुलाने मला प्रश्न केला. ‘बाबा हे पाकिस्तान काय अाहे, शाळेत पायऱ्या
चढताना सारे माझे फ्रेंड पाकिस्तान- पाकिस्तान म्हणतात.’ मी स्तब्ध झालाे. त्याला काय
उत्तर द्यावे हे मला सुचत नव्हते. पाकिस्तान अापला शत्रू देश अाहे असे त्याला सांगावे
म्हटले तर अापण बालवयातच त्याच्या मनावर शत्रुत्त्वाचे संस्कार तर करत नाहीत ना असा
प्रश्न मला पडला. मग काय सांगावे त्या राष्ट्राबद्दल…? मी जर
वेळीच मुलाच्या मनातील शंका दूर नाही केली तर ताे शाळेत इतर मुलांप्रमाणे पाकिस्तान-पाकिस्तान
म्हणायला लागला तर? ताे माेठा हाेऊन राेहीत अाणि कन्हैय्याच्या पंक्तीत तर नाही ना
जाणार हा गंभीर प्रश्नही कारण नसताना माझ्या मनाला स्पर्श करून गेला.
दाेन मिनिटांची
स्तब्धता झाल्यानंतर पुन्हा त्याने ताेच प्रश्न मला केला. मी अाधी न्यूज चॅनल बदलले.
टीव्ही बंद केला
अाणि त्याला सरळ उत्तर दिले. पाकिस्तान राक्षसांचा देश अाहे. हे उत्तर
देताना माझ्यातला पत्रकार, माध्यमांचा जबाबदार प्रतिनिधी केंव्हाच दूर गेला हाेता.
एक बाप अाणि एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या ताेंडून हे उत्तर बाहेर पडले.
परंतु, मी या उत्तराने स्वत:च संभ्रमात पडलाेय. काय सांगायचे
पुढच्या पिढ्यांना काेण पाकिस्तान? हैद्राबाद येथे राेहीत वेमुलाने केलेली अात्महत्या,
जेएनयूमध्ये सुरू असलेला कन्हैय्याचा देशविराेधी शाे. माध्यमं या साऱ्यांना देत असलेले
एकांगी टच अाणि भडक कव्हरेज, विद्यापीठांतून राजराेसपणे दिले जाणारे ‘इंडिया गाे बॅक’चे
नारे. (जेएनयूचे प्रकरण नेमके काय हे उपस्थितांना माहित. पण पुढच्या पिढ्यांवर मात्र
त्याचा वाईट परिणाम हाेताेय हे मान्य करायला हवे.)
या साऱ्यांनी मला पुरतं हालवून ठेवलंय.
एकीकडे पाकिस्तानात भारतीय क्रिकेटरच्या विजयाच्या अानंदात भारतीय ध्वज घेणाऱ्या एका
पाकिस्तानी नागरिकाला १० वर्षांची शिक्षा सुनावली जाते तर दुसरीकडे भारतात देशविराेधी
घाेषणा दिल्यानंतर भारताचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांना हायलाईट केले जातेय ताेच
माणूस सरकार तुमच्यावर कसे अन्याय करतेय हे त्यांना पटवून देत त्याची राजकीय पाेळी
भाजण्याचा प्रयत्न करताेय. काश्मिरमध्ये पाकिस्तान अाणि अायसीसचे ध्वज उंचावले जाताहेत.
देशविराेधी घाेषणा दिल्या जाताहेत. हे सारं मनाला व्यथित करणारं अाहे.
भारत अाणि पाकिस्तानची फाळणी झाल्यापासून या दाेन देशांमध्ये
असलेले वैर जगाच्या काेणत्याही काेपऱ्यात अापण गेलाे तरी चर्चिले जाताना दिसून येते.
किंवा येथील लाेकांना या दाेन देशांमध्ये असलेला ३६ चा अाकडा माहित असल्याची अापल्याला
जाणीव हाेते.
पाक पुरस्कृत दहशतवाद्यांतर्फे भारतात केल्या जाणाऱ्या या सप्रमाण अाणि
पुराव्यांसह अापण जगापुढे मांडल्या अाहेत. परंतु, अाता अापल्या देशातच अशा प्रकारे पाक पुरस्कृत
घाेषणा दिल्या जात असल्याने पुढच्या पिढ्यांच्या मनावर ते कुठंतरी घट्ट बिंबत चाललंय.
हे कुठंतरी थांबायला हवं अन्यथा पुढच्या पिढ्यांमधूनच अधिक देशविराेधी कारवाया हाेण्याची
शक्यता नाकारता येत नाही. माध्यमांनीही अशा प्रकारच्या घटनांना किती महत्त्व द्यावं
याचं तारतम्य बाळगणं गरजेचे अाहे.
No comments:
Post a Comment