मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका क्लिपमुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले अाहे. देशात साेशल मीडियाचा सुळसुळाट झाल्यानंतर अशा राजकीय क्लिप महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत. सध्या शंकेची ‘पाल’ चुकचुकण्याचे कारण वेगळेच अाहे. भाजप-सेनेला ‘घर’ (गड) राखायचा असल्याने राजकारणाने टाेक गाठले अाहे.
३२ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती अाहे. १९८४ साली पहिल्यांदा लाेकसभा निवडणुकांसाठी भाजप व शिवसेनेत युती झाली हाेती. भाजपच्या ‘कमळा’ वर मनाेहर जाेशी अाणि वामनराव महाडिक यांनी निवडणूक लढवली हाेती. यानंतरचा हा युतीचा प्रवास सुरू झाला हाेता. सातत्याने यात चढ-उतार येत गेले. स्व. प्रमाेद महाजन व स्व. गाेपीनाथ मुंडे यांनी युतीची धुरा खांद्यावर घेतली हाेती. त्यांच्या निधनानंतर मात्र युतीला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. नाेटबंदीनंतर या युतीला खऱ्या अर्थाने कधीही न संपणारे ग्रहण लागले अाणि मिठाचा माेठा खडा पडला. खडा कसला मिठाचे अागारच म्हणायला हवे.
८ नाेव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ वाजता नरेंद्र माेदी यांनी ५०० व हजाराच्या नाेटा बंद केल्या अाणि यानंतर झालेल्या शिवसेनेच्या प्रत्येक सभेमध्ये शिवसेनेने एकच सुर अाळवला. देशाचे अर्थकारण बिघडल्याचे उद्धव ठाकरे दाेन वर्षांपासून सांगत अाहेत. (नेमके कसले अाणि कुणाचे अर्थकारण गडबडले हा संशाेधनाचा विषय अाहे) सांगायचा भाग हाच की नरेंद्र माेदी यांचा हा ८ वाजताचा मुहूर्त युतीसाठी मात्र ‘गडबड’ ठरला अाहे.
राज्यात मागील एक वर्षात झालेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत, थेट सरपंच निवडणूक, विधान परिषद निवडणूक व लाेकसभेसाठीच्या पाेटनिवडणूकीत भाजपच्या विराेधकांच्या यादीत अाणखी एक नाव समाविष्ट झाले ते म्हणजे शिवसेनेचे. तसं सेनेनेही अापल्या विराेधकाची यादी अपडेट करत भाजपला यात सर्वाेच्च स्थानी बसवलेय. विराेधक कमकुवत असल्याने व त्यांना या ‘टाॅम अॅण्ड जेरी’ शाेचा फायदा उचलता न अाल्याने या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना व त्यांच्या सहकारी पक्षांचाच अधिक फायदा झाला हा भाग वेगळा.
केंद्रातील माेदी सरकारला चारवर्ष पूर्ण झालेत. अवघ्या एका वर्षात पुन्हा लाेकसभा निवडणुका हाेत अाहेत. गुजरात पाठाेपाठ कर्नाटक निवडणुकांमध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर अाता महाराष्ट्रातही राजकीय वारे वेगाने वहायला सुरूवात झालीय. याचाच एक भाग म्हणून पालघरची लाेकसभा पाेटनिवडणूक चर्चेचा विषय ठरतेय.
सध्या या निवडणूक प्रचारात जनतेला ६४ कला अाणि १४ विद्यांची अनुभूती हाेतेय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काेणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच या इराद्याने भाजप, शिवसेना, बहुजन विकास अघाडी, काॅंग्रेस असे सारेच पक्ष बाह्या सावरून कामाला लागलेत.
याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाची एक क्लिप सार्वजनिक केली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीसाठी सत्तेचा वापर करत दबाव तंत्राचा अवलंब करत असल्याचा अाराेप सेनेने केला अाहे. दुसरीकडे या क्लिपमध्ये एडिटींग करण्यात अाले असून, ती अर्धवट क्लिप दाखवण्यात अाल्याचे सांगत सेनेचा दावा मुख्यमंत्र्यांनीच खाेडून काढला अाहे. मुख्यमंत्र्यांनी क्लिप अापलीच असल्याचे सांगितल्याने व उर्वरित भाग साऱ्यांच्या समाेर अाणल्याने शिवसेनेचे बुमरॅंग उलटले अाहे. काेण खाेटे, काेण खरे हे येणारा काळच ठरवेल परंतु, पालघरच्या सहा विधानसभा मतदारसंघासह उभ्या महाराष्ट्राचे मात्र यातून चांगलेच मनाेरंजन हाेतेय हे नक्की.
पालघरची जखम
पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वानगा यांचे जानेवारीमध्ये ह्रदयविकराच्या धक्क्याने दिल्लीत निधन झाले. उत्तम जनसंपर्क, लाेकांच्या मदतीला धावणारा नेता, उत्कृष्ठ संघटक असणाऱ्या वानगा यांच्या निधनाने भाजपला चांगलाच धक्का बसला. वानगा हे एक दाेन नाही तर तब्बल तीनवेळा लाेकसभा तर २००९ मध्ये विधानसभेवर चांगल्या मताधिक्याने पालघरमधून निवडून अाले हाेते. त्यांनी या भागात भाजपला बळ दिले. वानगा यांच्या निधनानंतर त्यांचा माेठा मुलगा श्रीनिवास याला भाजपने लाेकसभेसाठी संधी द्यावी अशी वानगा कुटुंबीय व समर्थकांची इच्छा हाेती. मात्र भाजपच्या गाेटातून विष्णू सावरा व काॅंग्रेसतून भाजपत अायात झालेले राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. इथेच वानगा कुटुंबीय नाराज झाले अन् शिवसेनेकडे अायतीच संधी चालून अाली. शिवसेनेने दिवंगत वानगा यांच्या पत्नी व दाेन मुलांना पक्षात प्रवेश देत श्रीनिवास यांना उमेदवारीही जाहीर केली. भाजपला सेनेकडून असे काही केले जाईल याची अपेक्षा हाेतीच. पण यावेळी सेना अधिक अाक्रमक असेल असे मुख्यमंत्र्यांना वाटले नाही. सेनेची मनधरणी करण्याचा भाजपने भरपूर प्रयत्नही केला पण यावेळी मुख्यमंत्र्यांना यात यश अाले नाही.
एकीकडे शिवसेना व भाजपमध्ये ‘युद्ध’ सुरू असतानाच दुसरीकडे काॅंग्रेस अाणि बहुजन विकास अाघाडीनेही अापापले उमेदवार जाहीर करत निवडणुकीतील चुरस अाणखी वाढवली अाहे. अादिवासी भागातील अापली ताकद पहाता सीपीएमनेही अापला उमेदवार इथे उभा केला अाहे.
तासा-तासाला पालघरवर भाजप व सेनेकडून काहीना काही क्रिया-प्रतिक्रीया घडत असल्याने उभ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले अाहे. या साऱ्या राजकीय गाेळीबारात स्थानिक प्रश्नांचा साऱ्यांनाच विसर पडलेला दिसून येताेय. पालघरमध्ये सध्या बुलेट ट्रेनचा प्रश्न माेठा मानला जाताेय. पालघरच्या २५ जिल्ह्यांतून या बुलेट ट्रेनचा प्रवास हाेणार अाहे. केंद्र सरकारच्या विकासकामांमुळे स्थानिक मच्छिमारांचा तसेच शेतकऱ्यांचा सरकारवर राेष अाहे. वसईतील २९ गावं महापालिकेत येण्यास उत्सूक नसतानाही त्यांचा समावेश पालिका क्षेत्रात करण्यात अाल्याने गावकरी फडणवीस सरकारवर संतापले अाहेत. या विराेधात या भागात माेठे अांदाेलनही उभारण्यात अाले हाेते. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष्य करत या गावांचा पालिका हद्दीत समावेश केलाच. याचा माेठा फटका भाजपला पाेट निवडणुकीत बसू शकताे.
राजकीयदृष्ट्या विचार केला तर सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन जागा बहुजन विकास अाघाडीकडे, दाेन जागा भाजपकडे तर एक जागा शिवसेनेच्या ताब्यात अाहे. पालघर लाेकसभा मतदार संघाचा विचार करता अादिवासींसाेबतच उत्तर भारतीय तसेच गुजराती मतदारांना अाकर्षित करण्यासाठी भाजप सेनेकडून डावपेच अाखले जात अाहेत. पालघरमध्ये माेठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय असल्याने त्यांच्या मतांना अापल्याकडे वळवण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्य नाथ यांचीही सभा घेतली. स्मृती इराणींच्या माध्यमातून भाजपने गुजराती जनतेला अापलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक केवळ महाराष्ट्रापुरती उरली नाही तर अाता ती देशपातळीवर प्रतिष्ठेची झाली अाहे. मतदार नेमके कुणाला काैल देतात हे अाठवडाभरानंतर स्पष्ट हाेईलच परंतु, तुर्तास तरी निवडणूक प्रचारात तीन गाेष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात याचा शाेध कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील मतदारांनाली लागला अाहे. त्या तीन गाेष्टी म्हणजे. १. इंटरटेंन्मेंट २ इंटरटेंन्मेंट अाणि ३. इंटरटेंन्मेंट. जे भाजप व शिवसेनेकडून मतदारांचे याेग्य पद्धतीने हाेतेय.
लय भारी
ReplyDelete